Ticker

6/recent/ticker-posts

कोरपना -चंद्रपुर बससेवा पूर्ववत सुरू करा l Chandrapur l ST bus demand l




चंद्रपूर: प्रतिनिधी
बससेवा धानोरा – भोयगाव मार्गे पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होते आहे.
कोरपना तालुक्यातील कर्मचारी,व्यापारी, शेतकरी, ग्रामस्थ यांना जिल्हा मुख्यालय चंद्रपूर जाण्यासाठी भोयगाव हा कमी अंतर व जवळचा मार्ग आहे. त्यामुळे याच मार्गे नागरिक जाणे येणे पसंद करतात. परंतु एस टी संपापासून या मार्गावर नियमित सुरू असलेली बंद करण्यात आली आहे. परिणामी चंद्रपूर, एमआयडीसी, दाताळा, देवाडा, वेंडली, पिपरी, धानोरा, भारोसा, भोयगाव, एकोडी, इरई, विरूर, गाडेगाव, सोणूर्ली, कारवाई,हिरापुर, सांगोडा, अंतरगाव , वनोजा, झोटिग, कढोली खू ,
नारंडा, शिव नारंडा, वनसडी,लोणी, देवघाट, माथा , कुसळ , कातलाबोडी, धोपटाळा, कोरपना येथील प्रवाश्याची प्रचंड गैरसोय होते आहे. तसेच दालमीया सिमेंट उद्योग, विरूर डब्लू सी एल, जिनिंगचे कर्मचारी , शासकीय कर्मचारी, व्यापारी , शिक्षक , विद्यार्थी यांना अपडाऊन करण्यास अडचण निर्माण झाली आहे. चंद्रपूर व कोरपना येथून सकाळी साडे आठ , दहा , तीन , सायकाळी पाच वाजता नियमित बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी होते आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments