Ticker

6/recent/ticker-posts

*सत्याला न्याय मिळेल कि खोट्या तक्रारीला पाठबळ?* *ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती च्या अर्जावर अरेरावीचे उत्तर देऊन सभेतून पलायन* *खोट्या तक्रारीमुळे सरपंच सुद्धा आरोपिच्या पिंजऱ्यात*



चंद्रपूर -: सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील मेन रोडवर दामोधर नामदेव माधेशवार यांचे सन 1983 पासून नगर भुमापन क्रमांक 498 या जागेवर मातीचे कॊलारू 10 बाय 10 चे सलूनचे दुकान होते.त्यांचा मुलगा व नातवंडे त्या खोलीमध्ये सलूनचे काम करीत होते. हे सत्य आहे. अख्या गावाला व परिसरातील जनतेला माहिती आहे. आज काल जिकडे तिकडे फॅशनची निर्मिती झाल्याने नवीन पिढीतील मुलांच्या डिझायनर कटिंग आल्याने आपला धंदा (व्यवसाय )चांगल्या रीतीने चालावे. त्या धंद्यातून दोन पैसे मिळावे. हा उद्दिष्टे समोर ठेऊन मातीचे बांधकाम असलेले मकान पाडून नवीन बांधकाम करण्यासाठी सुरवात केली. तेव्हा दुकानाच्या मागे राहत असलेल्या श्रीमती ताराबाई राजेराम पिसे यांनी अटकावं करणे सुरु केले. तूझ्या दुकानची जागा माझी आहे. त्या जागेवर बांधकाम बांधू देणार नाही असे म्हणाली. तेव्हा या जागेचे संपूर्ण कागदपत्रे माझ्याकडे आहेत असं सांगितले असताना सुद्धा अरेरावी करणे चालू केले. तेव्हा समजदारीने त्या जागेचे कागदपत्रे दाखवावी. व ती जागा घेऊन जावी असे सांगितले. तरी पण ऐकायला तयार नाही. ती जागा आई च्या काकाने दिली.त्याअगोदर त्या जागेवर लाकडी पाठ्यांचा दुकान होता. तेव्हाच त्या जागेची रीतसर मागणी केली. तेव्हाच महाराष्ट्र शासन  कायदा कलम 20(2)नुसार दिनांक 11/03/1980 रोजी चौकशी केली आणि दिनांक 12/03/1980ला निकाल दिला होता.त्यानंतर कागदोपत्री दिनांक 25/02/1985 ला आईच्या नावे बक्षीसपत्र लिहून दिले. त्यानंतर दिनांक 20/01/1989ला शासनाने शासनाची प्रदानाची पावती दिली. त्या पावतीचा नंबर 460239 आहे. तेव्हा आखीव पत्रिका दामोधर माधेशवार यांच्या नावाने बनली आहे. त्या आखीव पत्रिका नगर भुमापन क्रमांक 498 असून 18 बाय 18 अशी जागेची नोंद आहे. ग्रामपंचायत स्तरावर दिनांक 07/12/2021ला संपूर्ण कागदपत्रे जोडून विनंती अर्ज केला. तेव्हा मा. सरपंच यांनी जागा मोजणी साठी आले. वादविवाद करणे सुरु केले. मा. सरपंच यांनी तंटामुक्त समितीला अर्ज करा. असे सांगितले. लगेच त्याच दिवशी दिनांक  07/12/2021ला मा. अध्यक्ष, तंटामुक्त समितीला अर्ज केला. दिनांक 15/12/2021ला सभा बोलावली. त्या सभेमध्ये कोणाची नं ऐकता निघून गेले. परत ग्रामपंचायत ला विनंती अर्ज दिनांक 20/122021ला केला. त्यामध्ये तिच्या कडील नोंदणी कृत कागदपत्रे मागण्याची विनंती केली. ग्रामपंचायत नी दिनांक 30/12/2021ला नोटीस दिला. तरीही कागदपत्रे उपलब्ध करून दिले नाही. ग्रामपंचायत नी मला दिनांक 13/01/2022 ला कोणतेही दस्तावेज उपलब्ध  करून दिले नाही. असे पत्र दिले. शेवटी निरूपाय म्हणून मा. ठाणेदार, पोलीस स्टेशन, सिंदेवाही यांना दिनांक 15/01/2022 ला विनंती अर्जाला जोडून संपूर्ण जागेचे कागदपत्रे व ग्रामपंचायत ला दिलेली अर्ज सादर करून आपल्या स्तरावरून दोघांना बोलावून जागेच्या कागदपत्राची तपासणी करावी. अशी विनंती केली होती. तेव्हा मा. नेरकर साहेब यांनी समोरासमोर बोलावून कागदपत्राची तपासणी केली. तेव्हा ताराबाई पिसे व मुलगा सुरेश पिसे यांनी नगर भुमापन क्रमांक 502 ची आखीव पत्रिका व नकाशा दाखविले. आम्ही नकाशाच्या भरोशावर रजिस्टी केली असे सांगितले. नेरकर साहेब यांनी आक्षेप घेतले. तरी मान्य करायला तयार नाही. हि बाब महसूल विभागाची आहे. असे पत्र दिले.तेव्हा नगर भुमापन क्रमांक 502, शीट नं.5, खरेदी दिनांक 27/06/1995 व फेरफार क्रं.1ची फेरफार पंजी मागणी भूमी अभिलेख कार्यालय व दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालय सिंदेवाही यांना अर्जाद्वारे व माहीतीच्या अधिकारात माहिती ची मागणी केली. तेव्हा दोन्हीही कार्यालयानी दप्तर तपासणी केली असता नोंदणीकृत दस्त आखीव पत्रिकेवर नमूद नसल्यामुळे विक्री पत्राची नोंद नसल्याचे लेखी पत्र लिहून दिले.हे दोन्हीही पत्र जोडून दिनांक 15/02/2021ला पुनःछ ग्रामपंचायत पत्र दिले तेव्हा ग्रामपंचायत ने तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सभा बोलावून संपूर्ण पदाधिकारी मोक्का जागेवर येऊन कागद पत्रानुसार मोजणी करून देत असताना हेतूपरस्पर वाद निर्माण करून स्वतःचं मारझोडचे कृत्य करून पोलीस तक्रार केली.त्यात मा. सरपंच यांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून सत्यावर पडदा टाकण्याचा प्रकार केला आहे. मुजोरीने शासनाने दिलेल्या पत्राचे उल्लंघन करण्याचे काम केले. आखीव पत्रिकेनुसार नगर भुमापन क्रमांक 498 व नगर भुमापन क्रमांक 502 चा संबधं नसताना आणि 502 चे कागदपत्रे नसताना वारंवार तक्रारी करणे. कोर्ट कचेरीचे नांव घेऊन नाहक त्रास देणे. हा त्यांचा नित्यक्रम झाला आहे. 


आजपर्यंत घराशेजारील लोकांना झगडे भांडण करून त्रास दिलेला आहे. (हे विशेष )त्यांच्याकडे माझ्या जागेचे कागदपत्रे असतील तर माझ्या हक्काची जागा सोडण्यास तयार आहे. असे वारंवार सांगितले आहे. तरी पण ऐकायला तयार नाही. मा. सरपंच, ग्रामपंचायत गुंजेवाही, मा. अध्यक्ष, तंटामुक्त समिती व मा. ठाणेदार, पोलीस स्टेशन सिंदेवाही यांना विनंती अर्ज केला.वाद विवाद नं होता शांततेच्या मार्गाने तोडगा निघेल हा दुष्टीकोन ठेऊन काम केला.पण व्यर्थ. आज आमच्यावर त्या जागेचा संपूर्ण कागदपत्रे असताना सुद्धा खोट्या तक्रारीला समोर जावे लागत आहे. आज त्या जागेवर 37-38 वर्षांपासून सलूनचे दुकान आहे. अख्या गुंजेवाही गावाला माहित आहे. आणि परिसरात माहिती आहे. असे असताना सुद्धा *सत्याला न्याय मिळेल कि खोट्या तक्रारीला पाठबळ* हा प्रश्न उपस्थित होतो. अशा लोकांवर शासनाने तात्काळ आळा घालावा. अशी मागणी अरुण माधेशवार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments