Ticker

6/recent/ticker-posts

*बहुचर्चित 'पैदागिर' चित्रपटाची टीम विद्यार्थ्यांच्या भेटीला...* *१६ सप्टेंबर रोजी 'पैदागिर' चित्रपटगृहात* l Chandrapur l sinema l Bollywood l




चंद्रपूर: दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त, संजय वंदना जिवने लिखित व‌ दिग्दर्शित "पैदागिर -शिक्षणाची संघर्षगाथा" या मराठी चित्रपटातील कलावंतांची टिम १० सप्टेबंर २०२२ ला चंद्रपूर येथील विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी येत आहेत.
एका आईचा तिच्या मुलांच्या शिक्षणाकरीताचा संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातुन मांडण्यात आलेला आहे.अत्यंत बिकट परिस्थितीतही एक आई आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी कसे जीवाचे रान करते; हे काळजाला भिडणारे कथानक या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आले आहे."शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जे कुणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही" डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.
चित्रपटाची नायिका सांची जिवने, गौरव, जय भगत, वंदना जिवने आणि इतर कलावंत डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, रिनायन्संस काॅलेज ऑफ मेनेजमेंन्ट दाताळा व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर तसेच नगीनाबाग परिसर येथे येणार आहेत. पुरोगामी साहित्य संसद महाराष्ट्र जिल्हा चंद्रपूर, व लर्नटू एज्यूकेट फोरमच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पुरोगामी साहित्य संसदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षा तथा लर्न टू एज्युकेट फोरम च्या जिल्हा संयोजिका ऍड.योगिता रायपुरे यांनी संस्थेच्या वतीने केले आहे.

Post a Comment

0 Comments