गोंडपिपरी : तालुक्यातील विठ्ठलवाडा याठिकाणी महात्मा गांधी तंटामुक्त समिती नव्या पुनर्गठीत करून अध्यक्ष निवडी संबंधी नुकतेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रामसभेत अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया राबवुन तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पदी आदिवासी युवा कार्यकर्ते श्री गणेश नारायण कोवे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीसबंधी त्यांचा मित्रपरिवार आणि चाहत्यांकडुन हार्दिक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे
0 Comments