( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती:-आपल्या वैवाहिक जीवनाचा प्रारंभ वृद्ध ,दिव्यांग ह्याना भेटून संवाद साधून व त्यांच्यासाठी बांधिलकी जोपासून करताना मला मनापासून आनन्द व समाधान लाभले असून त्यांचे कडून मिळणारे आशीर्वाद आमच्यासाठी भूषणावह आहेत असे प्रतिपादन विधी महाविद्यालय विद्यार्थी देविदास खंदारे ह्यानी डेबू सावली वृद्धा श्रमातील भेटीत व्यक्त केले
ह्याप्रसंगी त्यांनी डेबूसावली मधील वृद्धांना सकाळची भोजन सेवा दिली तसेच विकलांग सेवा संस्था संचलित शासनमान्य शिवभोजन केंद्राला 50 किलो तांदूळ उपलब्ध करून दिलेत व शिवभोजन लाभार्थ्याना लाडू वितरण केले
कार्यक्रम यशस्वीरीत्या सम्पन्न करण्यासाठी डेबू सावली वृद्धाश्रम संस्थापक श्री सुभाष भाऊ शिंदे व त्यांचे सहकारी ,अशोक खाड़े व विकलांग सेवा संस्था सचिव श्री देवराव कोंडेकर उपस्थित होते



0 Comments