Ticker

6/recent/ticker-posts

🔸बिलकिस बानो : भद्रावती येथिल धरणा आंदोलनास भक्कम प्रतिसाद.. 🔸राजकिय पक्ष व सामाजिक संघटनांचा जाहिर पाठींबा l bilkis Bano rape case l






🔸राजकिय पक्ष व सामाजिक संघटनांचा जाहिर पाठींबा ...
-----------------------------------------------
भद्रावती :
बिलकिस बानो या महिलेवर झालेल्या सामुहिक बलात्कार व तिच्या परिवारातील सात जनांची हत्या तसेच तिच्या तिन वर्षाच्या चिमुकल्या मुलिला दगडावर ठेचुन अमानवीय हत्या करणारे हत्यारे/नराधम यांना गुजरात सरकार ने १५आगस्ट २०२२ रोजी मोकाट सोडुन दिले.
या घटनेचा विरोध संपूर्ण देशात सुरु आहे.भद्रावती येथे माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना भद्रावती+व्हर्च्युअस मल्टीपर्पज सोसायटी भद्रावती+लोकमत सखी मंच भद्रावती या सामाजिक संगठनांच्या संयुक्त विद्यमाने दि.७ सप्टेंबरला " धरणा आंदोलन" करुन बिल्किस बानो चे बलात्कारी व अपराधी यांना " फाशीची शिक्षा झालीच पाहिजे" या मागणीसाठी एक दिवसीय धरना आंदोलन आयोजित केले होते.
या आंदोलनाला भद्रावती येथिल अनेक सामाजिक संगठना व राजकीय पक्षांनी जाहिर पाठींबा देवुन व आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होवून सामाजिक बांधिलकीचा एक अभिनव संदेश संपूर्ण जगाला दिला.
भद्रावती येथिल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणा आंदोलनाची सुरुवात विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन व त्यांना मानवंदना देवुन करन्यात आली.
माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व धरणा आंदोलन कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. तुळशीरामजी जांभुळकर साहेब, व महाराष्ट्र प्रदेश महिला अधक्षा सौ. शिल्पाताई बनपुरकर मैडम यांच्या उपस्थितीत व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधिंनीही महामानवास मानवंदना अर्पण केली.मंचावरील थोर महापुरुषांच्या प्रतीमांना पुष्पहार व पुष्पांजलि अर्पण करुन धरणा आंदोलनाची रितसर सुरुवात करण्यात आली.
भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे श्री. राजुभाई गैनवार यांनी प्रतिनिधित्व करीत आंदोलनास जाहिर पाठींबा असल्याचे घोषित करुन मंच संचालनास सुरुवात केली.नागेंद्र चटपल्लीवार यांनी धरणा आंदोलनाची प्रस्तावना सादर केली. कार्यक्रम स्थळी पक्ष व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधि यांनी मनोगते व्यक्त केलीत.यामध्ये आम आदमी पार्टी चे श्री.सोनल पाटील यांनी प्रतिनिधित्व करुन बिल्किस बानो वरील अत्याचाराचा निषेध करीत "आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे"अशा प्रकारची आग्रही भूमिका मांडली. B.R.S.P. बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी चे श्री.विकास दुर्योधन,भिम आर्मी भद्रावती चे श्री.अनवर भाई शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे श्री.संतोषभाई रामटेके, शिवसेना भद्रावती तर्फे श्री ज्ञानेश्वर जी डुकरे, इंडियन नेशनल कांग्रेस तर्फे श्री.सुभानभाई सौदागर, राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे सौ.दुर्गाजी बिश्वास, R.P.I.चे हरीषभाई दुर्योधन, हेल्पिंग हैंड मल्टिपर्पोज सोसायटी तर्फे कु.स्नेहा दारुंडे, लोकमत सखी मंच भद्रावती तर्फे सौ.सुनिता खंडाळकर व सामाजिक नेते श्री.रामटेके सर ई.प्रतिनिधींनी "आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे " अशाच प्रतिक्रिया व्यक्त करून धरणा आंदोलनास जाहिर पाठींबा दिला.
कार्यक्रमास्थळी माननीय नायब तहसीलदार साहेब येऊन निवेदन स्वीकारले त्यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती व देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांना देण्यात आले.
या कार्यक्रमास ब्रम्हपुरी,मुल व विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री दिपक नागपुरे, सुनिल रामटेके, जितेंद्र गुलानी, विजयानंद सपकाळ, सरफराज खान पठाण, सौ. कीर्ती पांडे , सौ.जयश्री कामडी व कल्पना गटुरवार यांनी परिश्रम घेतले.
आयोजकांतर्फे कु.किरण वि.साळवी यांनी संपूर्ण राजकीय पक्षांचे प्रतिनिधि व सामाजिक संगठनांच्या प्रतिनिधिंस सर्वांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments