*वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत घुग्गुस येथे सर्वधर्मीय महाआरती संपन्न*
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
चंन्द्रपुर: लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांविरूध्द जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. सद्भावना, सलोखा, सामाजिक समरसता, बंधूभाव आणि राष्ट्रप्रेम अशा सर्व भावनांनी ओतप्रोत गणेशोत्सव साजरा होणे आज अपेक्षित आहे. श्री. देवराव भोंगळे आणि त्यांच्या सहका-यांनी श्री गणेशाची सर्वधर्मीय महाआरती आयोजित करून सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश दिला आहे. या गणेशोत्सवाच्या माध्यमातुन समाजसेवेचा, लोककल्याणाचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचेल असा विश्वास वने व सांस्कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
दिनांक ८ सप्टेंबर रोजी घुग्गुस येथील गांधी चौकातील जय श्रीराम गणेश मंडळातर्फे सर्वधर्मीय महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. ही महाआरती श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यांच्यासह हिंदु धर्म, बौध्द धर्म, सिख धर्म, ख्रिश्चन धर्म मुस्लीम, धर्मातील प्रतिनिधींनी देखील श्री गणेशाची महाआरती केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतुन या महाआरतीचे आयोजन करण्यात आले. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे घुग्गुस शहरात आगमन होताच भव्य मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी त्यांचे औक्षण करण्यात आले. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नागरिकांना रेशनकार्डचे वितरण करण्यात आले तसेच ऐकता गणेश मंडळाला त्यांच्या हस्ते स्पीकर सेट भेट देण्यात आला.
यावेळी हिंदु धर्माच्या वतीने पंडीत गौरीशंकर मिश्रा, पं. अनिल त्रीपाठी, पं. वर्मानंद चौबे, पं. गजानन चिंचोलकर, पं. दिपक पांडे, प्रदीप कोहळे, मधुकर मालेकर, बौध्द धर्माच्या वतीने भंते रत्नमणी, रामचंद्र चंदनखेडे, अनिरूध्द आवळे, दिलीप कांबळे, श्रीनिवास कोट्टूर, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, भारत साळवे, भानुदास गंगाधरे, अजय आमटे, निरंजन नगराळे, अरुण साठे, दिलीप कांबळे, ख्रिश्चन धर्माच्या वतीने बिसप श्यामसुंदर नायडू, पास्टर आनंद गुंडेटी, वेलती कलगुर, पास्टर प्रभाकर कंडे तर मुस्लीम धर्माच्या वतीने शेख हनीफ, मोहम्मद इशहाक, मकसुद भाई, इम्तियाज अहमद, रज्जाक शेख, मुज्जू लोहानी, खलील अहमद, मकसुद भाई, शेख मुस्तफा, वसीम भाई, वाहीद अली, हसन शेख, नईम खान, अन्वर खान तर सिख धर्मीयांच्या वतीने जतींदर सिंग दारी, गुरजीत सिंग, गुरपाल सिंग, प्रदीप सिंग, प्रीतम सिंग यांनी महाआरती केली. शिव चौहान यांच्या भजन मंडळाने सुमधुर भजनाने मंत्रमुग्ध केले.
महाआरतीच्या यशस्वितेसाठी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, मंडळाचे अध्यक्ष सुनील बाम, सचिव धनराज पारखी, नितुताई चौधरी, चींनाजी नलभोगा, निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, सिनु इसारप, संतोष नुने, साजन गोहने, रत्नेश सिंग, अमोल थेरे, विवेक तिवारी, राजेश मोरपाका, विनोद चौधरी, बबलू सातपुते, शाम आगदारी, भानेश शेट्टी, प्रमोद सिद्दम, कोमल ठाकरे, हेमंतकुमार, वमशी महाकाली, संकेत बोढे, सचिन कोंडावार, पूजा दुर्गम, किरण बोढे, सुचिता लुटे, सुनीता पाटील उपस्थित होते. या महाआरतीला घुग्गुस शहरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
0 Comments