१९२० चे काँग्रेस अधिवेशन नागपूरमध्ये झाले . नागपूर सत्याग्रह ही एक लक्षणीय चळवळ मध्यप्रांतात झाली . संपूर्ण स्वातंत्र्य हे काँग्रेसने ध्येय ठरविल्यानंतर ३ फेब्रुवारी ते ३१ मार्च १९२८ या काळात सायमन कमिशनने आपला दौरा पूर्ण केला होता . म . गांधीनी असहकार व सत्याग्रहाची घोषणा करून आपली दांडी पदयात्रा ६ एप्रिल १९३० ला संपविली . वऱ्हाडात दहिहंडा येथे त्यांनी मिठाचा कायदा मोडला . यावेळी वामनराव जोशी यांना कैद करण्यात आले व बापुजी अणे यांनी चळवळीची सुत्रे हाती घेतली . २१ एप्रिल १९३० रोजी दुर्गाबाई जोशी यांनी मिठाचा सत्याग्रह केला . तसेच मध्यप्रांतामध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांनी जंगल सत्याग्रह करण्याचे ठरविले . २४ जुलै रोजी तळेगाव येथे जंगल सत्याग्रहाची सुरुवात झाली . त्याचा परीणाम चांदा जिल्ह्यातील अनेक गावात हि या आंदोलनाचे लोण पसरले त्या काळातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक मा.सा.कन्नमवार यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी पोंभुर्णा परीसरातील लोक जमा झाले जमलेला जमाव मोठ्या प्रमाणात होता . पोंभुर्णा येथील सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी जंगलाचा कायदा मोडला याबद्दल त्यांना इंग्रज सरकारने धरपकड सुरू केली यात यात सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांना जेल मध्ये रवानगी केली तेव्हा त्यांना सहा महिने सक्तमजुरी ची शिक्षा सुनावण्यात आली.
काही सेवा दलाचे कार्यकर्ते हे भुमिगत झाले. ज्यांची नावे ही यादिमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही त्यांना सुध्दा स्वातंत्र्य संग्राम सैनिक असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.


*कायरकर विस्तारु मेंडकु, बद्दलवार पांडुरंग माधन्ना, चांदेकर गंगाराम कृष्णप्पा, चांदेकर गोपीनाथ गंगाराम* ह्या सेवादलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सहा महिने सक्तमजुरी ची शिक्षा सुनावण्यात आली

*आज तिरंगा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या लोकांना ही माहिती आहे का?*

*_लेखक-अविनाश वाळके, पत्रकार-पोंभुर्णा
*