Ticker

6/recent/ticker-posts

शेतातील विहिरीत बुडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू#pombhurna#chandrapur#maharashtra


गोम पाटील तुकूम येतील घटना

तालुका प्रतिनिधी
आई-वडिलांसोबत शेतात गेलेल्या बारा वर्षीय एका बालकास आपला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना पोंभुर्णा तालुक्यातील गोम पाटील तुकुम येथे बुधवारी उघडकीस आली. हर्ष हेमंत बारसागडे वय बारा वर्षे असे या घटनेत मृत्यू पावलेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. हर्ष हा आई-वडिलांसोबत शेतात गेला होता. सायंकाळी घरी परत येण्याच्या वेळेस तो हात पाय धुण्याकरिता शेतातील विहिरीत जवळ गेला. तिथे मात्र त्याचा तोल जाऊन तो विहिरीत बुडाला व घटनास्थळीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे कुटुंबावर शोकळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments