Ticker

6/recent/ticker-posts

रेती चोरांनो तहशील कार्यालयाच्या मागील नाला पोखरला आता अंधारी नदी पोखरनार का ?* *विजय ढोंगे यांचा सवाल

*रेती चोरांनो तहशील कार्यालयाच्या मागील नाला पोखरला आता अंधारी नदी पोखरनार का ?*
       *विजय ढोंगे यांचा सवाल*

वैनगंगा न्यूज नेटवर्क

पोंभुर्णा प्रतिनिधी:- देशांत कोरोणा महामारी ने थैमान घातले आहे.गल्लीपासुन तर दिल्लीपर्यंत लाकडाऊण आहे.यात महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार कोरोना विरोधात लढाई लढत आहेत पन   पोंभुर्णा तालुक्यातील काही राजकीय पक्षांचे शिलेदार मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत मागील अनेक दिवसांपासून रेती तस्करि मोठ्या धुमधडाक्यात करीत आहेत.यावर मात्र कारवाई होताना दिसुन येत नाही.कोरोना मुळे यांना खुली सूट दिली आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होतो.
        तहशील कार्यालय पोंभुर्णा जवळच असलेल्या एका नाल्याला हे रेती चोरांनी पुर्णपणे पोखरला आहे या नाल्यातुन हजारो ब्रास रेती उपसा केल्यानंतर यांची नजर आता अंधारी नदीपात्रात पडली आहे.या नदीपात्रातून हि हजारो ब्रास रेती उपसा केल्या जात आहे.यामुळे भविष्यात पोंभुर्णा शहराला मोठ्या पाणी टंचाई ला सामोरे जावे लागनार आहे.अंधारि नदीपात्रात मोठ-मोठे रस्ते बनवुन हे शिलेदार रेती चोरी करीत आहेत
सदर रेती चोरांवर वेळीच आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.या रेती तस्करांच्या मुसक्या वेळीच आवळल्या नाही तर हे भविष्यात मोठे नुकसान दायक ठरू शकते.त्या रेती तस्करांची हिम्मत वाढत चालली आहे.त्यामुळे या रेती चोरांवर वेळीच आळा घालावा त्यांच्यावर फोजदारी कारवाई करण्यात यावी. शासकीय मालमत्तेचे चोरी चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष विजय ढोंगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments