Ticker

6/recent/ticker-posts

l birsa Kranti dal l pombhurna l बिरसा क्रांती दल पोंभुर्णा तालुक्याची उद्या बैठक



जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी उपस्थित राहण्याचे तालुका अध्यक्ष धनराज कोवे व महिला आघाडी तालुका अध्यक्ष वर्षाताई आत्राम यांचे आवाहन


पोंभुर्णा: बिरसा क्रांती दल तालुका शाखा पोंभुर्णा ची बैठक उद्या दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोज बुधवार ला राजराजेश्वर मंदिरा लगत असलेल्या भावनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत चंद्रपूर येथे होणाऱ्या रावण पूजन कार्यक्रमाच्या संदर्भाने विचार विमर्श करून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त आदिवासी बांधव कसे उपस्थित राहतील याविषयी सल्लामसलत करण्यात येणार आहे.


सर्वच समाजातील घटकांच्या अनेक संघटना कार्यरत आहेत आणि त्यांचे वरील होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा उभारत आहेत. मात्र या देशाचा मूळ रहिवासी असलेला आदिवासी समाज अत्यंत मागे आहे. समाजाला पुढे व एकसंघ कसे करता येईल यासाठी बिरसा क्रांती दल प्रयत्न करत आहे.
या लढ्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे आणि आपल्या समाजाची अस्मिता टिकवून ठेवणे नव्हे तर त्याला पुनर्जीवित करण्यासाठी एकसंघ होणे काळाची गरज आहे.
या बैठकीची वेळ दुपारी १२ वाजता असून या सभेला तालुक्यातील जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी उपस्थिती दर्शवून समाजासाठी योगदान द्यावे असे आवाहन बिरसा क्रांती दलाचे तालुका अध्यक्ष धनराज कोवे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष वर्षाताई आत्राम आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments