✍️विजय जाधव, नांदगाव प्रतिनिधी l नांदगाव:मुल तालुक्यातील नांदगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी महाजन, नरेश उमक यांचा लहान मुलगा "सुजल" नरेश उमक वय 15 वर्षे याचा आज दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी मल्टी हॉस्पिटल सावंगी मेघे येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची वार्ता नांदगाव येथे येऊन धडकताच नांदगाव शोक सागरात बुडाला आहे. नावाप्रमाणेच सुजल हा सर्वांशी थोरा - मोठ्यांशी, लहानांशी, समवयस्क मित्रांशी सौजन्याने वागत होता. त्यामुळे त्याच्या अचानक जाण्यामुळे गाव शोक सागरात बुडाला आहे.
प्रतिनिधी: विजय जाधव
0 Comments