Ticker

6/recent/ticker-posts

स्वाती हनुमान येरमे "नॅशनल चॅम्पियन अवार्ड"ने सन्मानित l azadi ka amrut mahotsav



चंद्रपूर 9 आगस्ट 2022 रोजी जागतिक आदिवासी दिन व आझादी का अमृत मोहोत्सवाचे निमीत्याने अप्पर आयुक्त कार्यालय नागपुर तर्फ वनामती सभागृह नागपुर येथील आयोजित राज्यस्तरीय आदिवासी सान्स्कृतीक मोहोत्सव व गुनगौरव या कार्यक्रमाद्वारे भद्रावती तालुक्यातील गवराळा येथील कू . स्वाती हनुमान येरमे हिला हैण्डबाल या खेळाचा नॅशनल च्याम्पियन अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.


तसेच अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांचे हस्ते , शाल , श्रीफळ व प्रशस्ती पत्र देऊन गौवरवन्यात आले . याचे श्रेय तिने प्रमुख मार्गदर्शक उमेस्वर आत्राम सर, पण्डित नेहरु शाळा इंदिरा नगर चंद्रपुर , गावंडे सर , लोकमान्य विध्यालय भद्रावती तथा सौ बाम्बोळे मैडम विवेकानंद विद्यालय , भद्रावती , सौ दलान्जे मैडम नागपुर व मंगेश येरमे हैण्डबाल प्रशिक्षक भद्रावती यान्ना दिले . सर्व स्तरावरुन तिचे अभिनंदन होत आहे . सदर कार्यक्रमात उद्घाटक . . नितिनजी गडकरी , देवेंद्रजी फडणवीस हे होते .

Post a Comment

0 Comments