Ticker

6/recent/ticker-posts

Pombhurna l Chandrapur # Maharashtra सुदैव: काल पुरात वाहून गेलेली बैल जोडी सुदैवाने गंगापूर कडे जिवंत निघाली




पोंभुर्णा प्रतिनिधी
तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर आणि वैनगंगा नदीच्या विळख्यात वसलेल्या जुनगाव येथे काल सायंकाळच्या सुमारास पुरामध्ये बैल जोडी वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती. दोन्ही बैल एकमेकांना बांधून जोडी टाकून असल्यामुळे ते जिवंत राहतील व जिवंत निघतील याची कुणालाही शाश्वती वाटत नव्हती. मात्र सुदैवाने साथ ते आठ किलोमीटर अंतरावर गंगापूर नजीकच्या परिसरात ही बैल जोडी सुखरूप जिवंत निघाली. मात्र या दुर्घटनेत बैलांना बराच मार लागलेला असल्याचे कुमार दुधनवार या शेतकऱ्याने सांगितले. जखमी झालेल्या बैलांना वाचविण्यासाठी शासनाने पूरग्रस्त मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.


९ ऑगस्ट पासून जुनगाव येथील वैनगंगा नदी ला मोठा पूर आलेला आहे. आज 13 ऑगस्ट रोजी सुद्धा या गावचा संपर्क इतर गावाशी तुटलेलाच आहे. नऊ ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या दरम्यान 10 ऑगस्ट रोजी ईश्वर शामराव ठाकूर या तरुणाचा सर्पदंशाने वेळेवर उपचार न मिळू शकल्याने दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला होता. त्यातच 12 ऑगस्ट रोजी बैल जोडी वाहून गेल्याने या गावावर अनिष्टच आले की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली. मात्र प्रशासनाच्या वतीने कुठलीही सहानुभूती किंवा आरोग्य शिबिर लावण्याची मागणी केली असता दक्षता घेतली नाही. मागील पंधरवड्यात एक आठवडाभर आणि आता पाच दिवस जुनगाव पुरामध्ये वेढलेला असताना सुद्धा या गावात साधी आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ नये हे या गावचे दुर्दैव म्हणावे लागेल. आत्ताच्या आलेल्या पुरात व मागील पुरातही अनेक हेक्टर शेती बुडून नाश पावली आहे. मागीलपुरातील नुकसानीचा सर्वे करण्यात आला मात्र अद्याप मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. शासनाच्या वतीने पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा असे आवाहन करण्यात येत आहे मात्र शासनाच्या आवाहनालाही प्रशासन महत्त्व देत नसल्याचे निदर्शनास येत आहे.


काल बारा ऑगस्ट रोजी झालेल्या दुर्घटनेत कुमार मारुती धनवार यांची बैल जोडी पुरातून सुखरूप बचावली असल्याने शेतकऱ्याने ईश्वराचे आभार व्यक्त केले आहे. तद्वतच त्यांनी ईश्वरासोबतच शासन प्रशासनही आपल्याला ईश्वर बनून मदत करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments