Ticker

6/recent/ticker-posts

Chandrapur l gondpipari चेक बोरगाव येथील वीज पडून मृत्त पावलेल्या धनराज निमगडे यांच्या कुटुंबीयांना चार लक्ष रुपयाच्या धनादेशाचे वितरण




गोंडपिपरी:-
दि.१२ऑगस्ट २०२२

गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगाव येथील श्री.धनराज निमगडे यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा ३१ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृतकाच्या कुटुंबीयांची परिस्थिती हालाखीची असल्याने गावातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते,तथा माजी उपसरपंच, तालुका काँग्रेस कमिटी अनु. जाती विभागाचे अध्यक्ष श्री. गौतम झाडे यांनी घडलेली घटना तात्काळ क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.सुभाषभाऊ धोटे यांचेकडे मदतीसाठी मांडली. आमदार साहेबांनी सदर मृतकाच्या परिस्थितीच्या गांभीर्याची दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला. व आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या प्रयत्नांतून सदर मृतकाच्या कुटुंबीयास चार लक्ष रुपयाचा धनादेश मंजूर झाला.व आज दि.१२/०८/२०२२ रोजी तहसीलदार के.डी. मेश्राम साहेब यांचे उपस्थितीत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सविता बबलू कुडमेथे यांचे हस्ते मृतकाच्या पत्नी अलका धनराज निमगडे यांना ४ लक्ष रुपयाचा धनादेश वितरित करण्यात आला.

   महाराष्ट्रसह संपूर्ण विदर्भात पावसाने कहर केला आहे. विविध ठिकाणी विजांच्या कडकडासह यावर्षी संततधार पावसाने हजेरी लावली आहे. दिनांक २९/०७/२०२२ रोजी गोंडपिपरी तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर बरसला. जिकडेतिकडे विजांचा कडकडाट. तालुक्यातील चेक बोरगाव येथील श्री. धनराज निमगडे वय ५० वर्षे हे नामक जंगल लगत शेतात चराईसाठी नेलेली गावातील गुरे राखत असताना सायंकाळच्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज कोसळली. व त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णांच्या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता तात्काळ चंद्रपुरात हलविण्यात आले. चंद्रपुरात सुद्धा त्या रुग्णाची परिस्थिती आवाक्याबाहेर असल्यामुळे त्या रुग्णाला तात्काळ नागपूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवून उपचार सुरू करण्यात आले. परंतु दिनांक ३१/०७/२०२२ रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

      मृतक धनराज निमगडे यांची आर्थिक परिस्थिती अतिशय निर्ढावलेली होती.त्यामुळे ते स्वतः व कधी कधी त्यांची पत्नी अलका निमगडे ह्या सुध्दा त्यांना गावातील गुरे चारण्यासाठी राखणीला सहकार्य करत होत्या. परंतु काळाने त्यांच्या घरातील रोजी रोटी करणारा प्रमुख गेल्याने घरावर आर्थिक संकट कोसळलं. मृतक धनराज निमगडे यांच्या पश्चात पत्नी अलका धनराज निमगडे व मुलगा प्रवीण धनराज निमगडे असा आप्त परिवार आहे. सदर कुटुंबीयाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने गावातीलच धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. गौतम झाडे यांना बघविले गेले नाही. त्यांनी मृतकाच्या घरच्या परिस्थितीची माहिती लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या लक्षात आणून दिली. मृतकाच्या कुटुंबीयांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार साहेबांनी आर्थिक मदतीसाठी तात्काळ पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले व त्या मृतकाच्या कुटुंबीयास चार लक्ष रुपयाची मदत मंजूर झाली.
   
       आज मृतकाच्या कुटुंबीयास तालुक्याचे तहसीलदार श्री.के.डी.मेश्राम साहेब यांचे उपस्थितीत गोंडपिपरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सविता बबलू कुडमेथे यांचे हस्ते चार लक्ष रुपयाचा धनादेश मृतकाच्या पत्नी अलका धनराज निमगडे यांना सुपूर्द करण्यात आला.

    या दरम्यान सौ. सविता बबलू कुडमेथे नगराध्यक्षा न. पं. गोंडपिपरी, श्री. के.डी. मेश्राम तहसीलदार गोंडपिपरी, श्री.तुकाराम झाडे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गोडपिपरी, श्री.निलेश संगमवार कार्याध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी गोंडपिपरी, श्री. देवेंद्र बट्टे शहराध्यक्ष शहर काँग्रेस गोंडपिंपरी, श्री. गौतम झाडे अध्यक्ष अनुसूचित जमाती विभाग काँग्रेस गोडपिपरी, श्री.सुदर्शन कोवे सरपंच चेक बोरगाव, सौ.किरण झाडे पोलीस पाटील चेकबोरगाव, श्री.नीलकंठ चौधरी माजी तंटामुक्ती अध्यक्ष चेक बोरगाव, श्री.जोगेश्वर उपासे उपसरपंच चेक बोरगाव,श्री. दीपक सोयाम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चेकबोरगाव श्री. सुनीलभाऊ फुकट काँग्रेस कार्यकर्ते गोंडपिपरी,श्री. करण चन्नावार, श्री.गजानन पा. झाडे,श्री.बंडू चूनारकर सचिव चेक बोरगाव, श्री. शांताराम वेलादी, श्री.विजय देवगडे,श्री. सुनील मांडवकर,श्री.संदीप सांगळे,श्री.मंगेश पेंदोर आदींची उपस्थिती होती.


...तालुका सोशल मीडिया काँग्रेस कमिटी गोंडपीपरी....

Post a Comment

0 Comments