भंडारा,
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात एका ३५ वर्षीय महिलेवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर नग्नावस्थेत तिला रस्त्याच्या कडेला फेकून नराधमांनी पळ काढला.
भंडारा कारधा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश थोरात यांनी सांगितले की, पुलाजवळ एक महिला विवस्त्र अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्याला रुग्णालयात पाठवले. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. थोरात यांनी सांगितले की, पीडित महिलेला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे. पुढील तपास गोंदिया पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. दुसरीकडे गोंदियाचे एसपी विश्व पानसरे यांनी सांगितले की, आम्ही गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे.
कनहाडमोह गावाजवळ झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडीतेची अवस्था गंभीर आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली असून आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती आहे. 30 जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान 35 वर्षीय महिलेवर कनहाडमोह गावाजवळ वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केले होते. त्यानंतर ती गावकऱ्यांना गंभीर अवस्थेत महामार्गाच्या शेजारी आढळली होती. सुरुवातीला पीडितेला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची गंभीर अवस्था लक्षात घेत तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथेही तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. प्रचंड रक्तस्त्राव होत असल्यामुळं सुरुवातीला डॉक्टरांनी ते थांबवण्याचे प्रयत्न केले. नंतर आवश्यक असलेली कोलोस्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली.


1 Comments