Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस तर्फे पोंभूर्ण्यात मोदी सरकार विरोधात जनआंदोलन.... महागाई विरोधात तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन...




पोंभूर्णा :- वाढती महागाई , इंधन, जीवनावश्यक वस्तूवर लावल्या गेलेल्या जीएसटी च्या विरोधात कांग्रेस तालूका अध्यक्ष श्री कवडूजी कुंदावार यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 05-08-2022 रोजी जनआंदोलन करून सर्वसामान्य गरीब जनतेला न्याय मिळावा यासाठी आपल्या सहकार्यांना घेवून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले... 


गेल्या कित्येक दिवसापासून सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, आणी आता जिवनावश्यक वस्तूवर सुद्धा जीएसटी लावण्यात आली. आणी त्यामुळे सर्वसामान्य जनता महागाई चा तिव्र ताण डोक्यावर घेवून जगत आहे आणी त्यामुळे गरीब जनतेची दिनचर्या ही फाटक्या पदरासारखी झाली असून या सर्व गोष्टींचा तालूका स्तरावर अभ्यास करून आज महागाई विरोधात तिव्र जनआंदोलन पुकारण्यात आले आणी यासाठी तहसीलदार यांना त्याबद्दल निवेदन सुद्धा देण्यात आले. 


यावेळेस कवडूजी कुंदावार , तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी पोंभूर्णा, रूषीजी पोल्लेलवार, गजानन सेमले सरपंच नवेगाव मोरे, राजाराम मोहूर्ले, विनोद थेरे, स्वप्नील चौधरी, बापूजी चिंचोलकर, ईश्वर भाऊ पिंपळकर उपसरपंच ग्रामपंचायत चकफुटाणा , दुर्गे नवेगाव मोरे, वसंत पाटील मोरे, प्रदिप बुटके, दिपक पावडे, सुनीताताई भुरसे, आशा मानकर, चिंंदू बुरांडे, विनायक बुरांडे, देवराव कडते , नवनीत नरसपुरे, सुनिल कावटवार युवा कार्यकर्ते वेळवा , तथा शेकडो काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments