Ticker

6/recent/ticker-posts

*माझा प्रभाग माझी जबाबदारी* 🏖️*सभापती सौ.दिपाली मुकेश नामेवार यांनी राबविले स्वाक्षरी अभियान#gadchiroli



मागणी - डीपी स्थानांतर करून अर्धवट असलेली नाली बांधकाम पूर्ण करण्याबाबत

गडचिरोली: अहेरी सुखसागर एम. झाडे.

अहेरी शहरात काल झालेल्या मुसळधार वादळी पाऊस पडल्यामुळे शहरात सर्वत्र पाण्याने जनजीवन विस्कळीत केलं,त्यात प्रभाग क्रमांक 6 मधील स्थानिक रहिवासी नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी घुसले.


दानशूर चौक ते आझाद चौक या रस्त्यावरील असलेले डी पी मुळे नाली बांधकाम अर्धवट थांबलेले आहे,त्यामुळेच पावसाळ्यात नालीतील पाणी स्थानिक रहिवासी नागरिकांच्या घरात घुसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. सदर बाब लक्षात घेता सभापती सौ.दिपाली मुकेश नामेवार यांनी प्रभागात स्वाक्षरी अभियान राबवून नगरपंचायत मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले, व आज तात्काळ प्रभागातील नागरिकांसोबत मुख्याधिकारी यांचेशी चर्चा करून तात्काळ उपाययोजना करण्या करिता भाग पाडल्यामुळे तात्काळ सदर नालीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments