Ticker

6/recent/ticker-posts

* गुड मार्निग भि.सी.ग्रुप द्वारे पर्यावरण वाचवा आंदोलन* #pollution




चंद्रपूर- मूल-गडचिरोली नागपूर हा मार्ग पूर्वेस सरळ छत्तीसगड, मध्यप्रदेशकडे जात असून चंद्रपूर बल्लारपूर मार्ग दक्षिणेस तेलंगणा, आंध्रप्रदेश, चेन्नई, तामिळनाडू कडे जाणारा असल्याने हा मार्ग हायवे असल्याने या मार्गावरून रोजच हजारो चे संखेनी ट्रक, चारचाकी वाहन, दुचाकी वाहन हायवा, चोवीस चाकांचे वाहन नियमित धावत असतात. त्यामुळे इतर वाहतूक धारकांना अडचण निर्माण होत असते.
तसेच याच रेल्वे फाटकाला लागूनच कर्मवीर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, लहान मुलांचे कांव्हेंट लागून असल्याने शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनीना कॉलेज मधे जाण्या-येण्यासाठी कुठलाही दुसरा मार्ग नसल्याने हेच रेल्वे फाटक रोजच ओलांडून जाणे भाग पडत आहे. हजारो विद्यार्थांची सायकल व पायी जाणे अडचणीचे होत आहे. प्रसंगी बोर्ड व विद्यापीठ परीक्षेचे पेपर जर सुरू असेल तर मात्र कुठूनच जाता येत नसल्याने पेपरला देखील वेळेवर उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. दैनंदिन रेल्वे जात असताना रेल्वे फटकपासून चंद्रपूर रोडकडे डोंगरी पर्यंत तर मुल नगराकडे येणाऱ्या रस्त्याकडे दुय्यम निबंधक कार्यालय पर्यंत २ तासापर्यंत संपूर्ण वाहतूक थांबलेली असते.अश्या परिस्तिथीत मूल येथे रेल्वे माल धक्का यांचे काम सुरू आहे आणि त्यासाठी पर्यायी रस्ता रेल्वे फाटकाजनजीक आहे, मूल मध्ये आरोग्य जपण्यासाठी आणि शुद्ध हवा घेण्यासाठी आणि विद्यार्थी यांना खेडण्यासाठी एकच पटांगण आहे,अश्या परिस्तिथीत जर कॉलेज पटांगणाशेजारी माल धक्का झाल्याने 1000 ट्रक एका वेडेस चालतील आणि जनजीवन आणि स्वास्थ यात प्रचंड हानी होईल
म्हणून समस्त मूल जनतेला आणि निसर्ग सौंदर्य प्रेमी लोकांना माजी हाथ जोडून विनंती आहे की मूल मध्ये होणारा माल धक्का गावाचा आणि कॉलेज पटांगणाचा दूर करण्यात यावा यासाठी प्रयत्न करावे 🙏🙏
*माल धोक्याचे काम सुरू झाले आहे
*🙏आज नाही तर कधी नाही🙏*

Post a Comment

0 Comments