Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी श्याम भाऊ नार्लावार यांना पितृशोक - वासुदेव सावकार नारलावार यांचे निधन




विजय जाधव: प्रतिनिधी नांदगाव
मूल तालुक्यातील प्रतिष्ठित व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदगाव येथील प्रतिष्ठित किराणा व्यापारी श्री श्याम भाऊ नारलावर यांचे वडील श्री वासुदेव विठोबाजी नारलावर यांचे त्यांचे राहते घरी वृद्धापकाळाने आज सकाळी साडेनऊ वाजता दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८२ वर्ष होते. त्यांचे पश्चात चार मुली अलका, संगीता, सविता, निशा आणि दोन मुले श्याम आणि राम व पत्नी कुसुम वासुदेव नारलावर व नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचेवर आज दिनांक १० जून रोजी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता वैनगंगा नदी च्या मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. असे त्यांच्या स्वकीयांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments