Ticker

6/recent/ticker-posts

वासुदेव सावकार नारलावार अनंतात विलीन:दिग्गजांची उपस्थिती




विजय जाधव: प्रतिनिधी नांदगाव
     मूल तालुक्यातील प्रतिष्ठित व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदगाव येथील प्रतिष्ठित किराणा व्यापारी श्री श्याम भाऊ नारलावार यांचे वडील श्री वासुदेव विठोबाजी नारलावार यांचे त्यांचे राहते घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. 


मृत्युसमयी त्यांचे वय ८२ वर्ष होते. त्यांच्या निधनाची वार्ता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद भाऊ अहिरकर यांना लागताच त्यांनी तात्काळ त्यांचे गृहस्थाने गाठून शोकमग्न कुटुंबीयांचे सांत्वन केले. 


वासुदेव सावकार यांची अंत्ययात्रा नांदगाव वरून सात किलोमीटर असलेल्या जुनगाव देवाडा भुज. वैनगंगा नदीवर निघाली.


 या अंत्ययात्रेत जिल्हा परिषद चंद्रपूर चे माजी अध्यक्षपदी तथा या विभागाचे काँग्रेस नेते श्री विनोद भाऊ अहिरकर हे आवर्जून उपस्थित होते. वासुदेव सावकार नारलावार यांना वैनगंगा नदीच्या मोक्षधामावर अग्निसंस्कार करण्यात आले. 


यावेळी स्वतः विनोद अहिरकर यांनी वासुदेव सावकार नारलावर यांचे सरण रचण्याच्या कामात हातभार लावून मार्गदर्शन केले सरण रचणार यांना मार्गदर्शन केले.


वासुदेव सावकार नारलावार यांच्या पश्चात चार मुली, अलका, संगीता, सविता, निशा आणि दोन मुले श्याम आणि राम ,पत्नी कुसुम वासुदेव नारलावार व नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचेवर आज दिनांक १० जून रोजी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता वैनगंगा नदी च्या मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी असंख्य जनता उपस्थित होती.असे त्यांच्या स्वकीयांनी कळविले आहे.






Post a Comment

0 Comments