जनवार्ता भारत
चंद्रपूर: येथील अडकिने परिवारातील मुलीच्या विवाह समारंभात अंधश्रद्धा निर्मूलन चमत्कार प्रात्यक्षिक प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.विवाह विधि सम्पन्न झाल्यावर नव विवाहित दांपत्यानी पुष्पगुच्छ देऊन आमचे स्वागत केले. यानंतर अनिल दहागावकर आणि धनंजय तावाडे यांनी विविध चमत्कार प्रात्यक्षिक व त्या मागील कारणे सांगुन अशा तथाकथीक चमत्कारा वर विश्वास न ठेवता स्वतः मध्ये चिकित्सक बुद्धि व वैधानिक दृष्टिकोण निर्माण करून शोषण विरहित समाज निर्माण करावे आणि आनंदी जीवन जगण्याचे आवाहन केले . याप्रसंगी नव वराने सुद्धा आपले विचार व्यक्त करतांना सादर केलेल्या कार्यक्रमाची स्तुती केली व वधु कढिल अडकिने परिवाराचे अभिनंदन करून सर्वांनी वैधानिक दृष्टिकोण जोपासन्याचे आवाहन केले .कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राजू अडकिने यांनी केले .

0 Comments