Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष पत्रुजी गेडाम यांचे निधन




चामोर्शी प्रतिनिधी
     चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष, पत्रुजी कावरु गेडाम, वय 67 वर्ष, यांचे दिनांक ८ जून रोज बुधवार ला पहाटेच्या सुमारास निधन झाले.
        पत्रुजी गेडाम यांनी व्यसनमुक्ती केंद्रात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. अनेकांना त्यांनी व्यसनमुक्त केले आहे. प्रत्येक गाव व्यसनमुक्त व्हावे यासाठी त्यांचा प्रयत्न होता. याच माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन कार्य केलेले आहे. त्यांचेकडे सतत दोन वर्ष महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पद होते. या पदाचा वापर करून त्यांनी गावात शांतता आणि सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्यासाठी व गाव सुजलाम-सुफलाम करण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता.
       त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून बहिण भाऊ व नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचेवर आज वाघोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments