पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
पोंभुर्णा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुभाष कुकूळकर यांचा उपचारादरम्यान नागपूर येथील खासगी रुग्णालयात काल दिनांक ७ जून रोजी मृत्यू झाला. घटनेची माहिती पोंभुर्णा शहरात होताच पोंभूर्णा पोलीस ठाण्यात शोक व्यक्त करण्यात आला.
आज दिनांक ८ जून रोजी त्यांचे मूळ गाव गोंडपिपरी तालुक्यातील तारसा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोंभुर्णा पोलीस ठाण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी हे त्यांच्या ताफ्यासह तारसा येथे उपस्थित आहेत. मृतक पोलीस हवालदाराच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई वडील व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
      महिनाभरात पोंभूर्णा पोलीस ठाणे दोन पोलिस हवालदार गमावले असल्याचे दुःख पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दिसत होते. यापूर्वी दिनांक २२ मे रोजी याच पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार तुळशीराम कुळमेथे यांचाही मृत्यू झाला होता, हे येथे उल्लेखनीय!

________________________________________
                 परमेश्वराच्या इच्छेपुढे कोणाचेही चालत नाही. परमेश्वर या शोकमग्न कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी ची शक्ती प्रदान करो-
 ठाणेदार धर्मेंद्र जोशी