Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श ग्राम पंचायत घाटकुळ येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा



 पोंभुर्णा: आदर्श ग्राम पंचायत घाटकुळ येथे शिवस्वराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.आज ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच सुप्रीम गदेकार, खुशाब मानपल्लीवार ग्रामसेवक यांच्या पुढाकारातून शिवस्वराज्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे मा. विनोद देशमुख सदस्य पंचायत समिती पोंभूर्णा . सरपंच सुप्रीम गदेकार, माजी सरपंच सौ प्रीतीताई मेदाडे , कृषि सेवक पेंदोर सर तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी धनंजय साळवे साहेब उपस्थित होते.
पथनाट्यातून सुधाकर भाऊ बावने यांनी व गावकऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी तालुका प्रशासनाकडून गावाला विशेष योगदान देण्याबद्दल गट विकास अधिकारी माननीय साळवे सर यांचा ग्रामपंचायत च्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखणे स्वच्छता हीच खरी सेवा आहे. आपले तन मन प्रसन्नतेसाठी परिसर नीटनेटके ठेवा.   गावात समता बंधुभावाने काम करा व व्यसनमुक्त व्हा यासाठी सर्व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन इतरांना प्रेरणा देणारे गाव घडवावे असे प्रतिपादन गट विकास अधिकारी साळवे सर त्यांनी केले.व त्या प्रसंगी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.कृषिसेवक माननीय पेंदोर सर व कोसरे सर यांनी गावकऱ्यांना कृषी विषयक पेरणी पुर्वची पूर्वतयारी सल्ला देवून मार्गदर्शन केले व वेगवेगळ्या कृषी योजनांची माहिती दिली. व त्यानंतर आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते ओम चैतन्य दवाखाना गोडपिपरीचे डॉ. आईंचवार सरांनी आरोग्य विषयी माहिती दिली व व आरोग्य उपकेंद्र घाटकुळ अंतर्गत लोकांची आरोग्य तपासणी करून घेतली.
उमेद अंतर्गत मा. अहिरकर सर माहूरकर सर यांनी महिला बचत गटातील महिलांना महिला विषयी व महिला बचत गट याबद्दल व कुकुटपालन, कुटीर उद्योग व बचत गटातील विविध महिला उद्योग बद्दल माहिती दिली .
 विनोद देशमुख पंचायत समिती सदस्य यांच्याकडून 15 वित्त आयोग मधून पोभुर्णा तालूक्यातील दिव्यांग( बंडू ) यांची नोंद घेऊन त्याला व इतरांना पाणी कँन वाटप करण्यात आले. तर पंधरा टक्के मागासवर्गीय अंतर्गत ,दहा टक्के महिला बालकल्याण, तर पाच टक्के दिव्यांग कल्याण व आदर्श व स्मार्ट ग्राम पुरस्कार2019 -20 योजनेअंतर्गत लाभार्थींना ग्राम पंचायत घाटकुल कडून पाणी कँन वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत पदाधिकारी सौ शीतल ताई पाल ( उपसरपंच ) सौ रजनी ताई हासे ( सदस्य ) सौ रंजना ताई राळेगावकर ( सदस्य ) सौ कल्पना शिंदे ( सदस्य) सौ लताताई खोबरे ( सदस्य ) श्री विठल पा धदरे (सदस्य ) श्री जयपाल दुधे (सदस्य ) श्री प्रकाश पा. राऊत (सदस्य ) श्री अशोक पा. पाल (पोलीस पाटील ) माजी सरपंच प्रितीताई मेदाडे ,) श्री खुशाब व्येंकाजी मानपलीवार ( ग्रामसेवक ) श्री अनिल हासे (शिपाई ) श्री उत्तम देशमुख (शिपाई) श्री .वामन कुद्रपवार (रोजगारसेवक ) श्री आकाश देठे ( संगणक परिचालक) राम चौधरी ( स्वच्छग्रही ) , जि. प. शाळा , महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय , अंगणवाडी सेविका ,मॅजिक बस चे समुदाय संघटक ,बालपंचायत टीम , मराठा युवक मंडळ व जनहित युवक मंडळ, बचत गटाच्या महिलांनी CRP काँडर व सर्व सखी आणि ग्रामस्थानी मोठ्या संख्येने उपस्थितिने पुढाकार नोंदवला , 
यावेळी सूत्र संचालन श्री खुशाब व्येकांजी मानपल्लीवर ग्रामसेवक यांनी केले तर आभार प्रदर्शन राम चौधरी यांने केले.

Post a Comment

0 Comments