Ticker

6/recent/ticker-posts

*💥रानडुकराच्या हल्ल्यात महिला ठार, आहेरी तालुक्यातील घटना*



गडचिरोली प्रतिनिधी
     तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर रानडुकराने हल्ला करून तिला ठार केले आहे. सदर घटना शुक्रवार दिनांक 20 मे रोजी घडली. सपना पोचंना जिंनका 36, राहणार कमापूर तालुका आहेरी जिल्हा गडचिरोली असे हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
     नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास सपना जंगलात तेंदूपत्ता तोडण्या करिता गेली होती. दरम्यान अचानक रानडुकराने तिच्यावर हल्ला केला यात ती गंभीर जखमी झाली. उपचार मिळण्याआधीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून तेंदूपत्ता तोडणार यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments