Ticker

6/recent/ticker-posts

*शाश्वत जीवन कार्यशाळा* जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७


*शाश्वत जीवन कार्यशाळा* 

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७

मुंबई: हवामान बदलाबाबतचा आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाचा ( IPCC ) अहवाल नुकताच आला आहे. जनतेला वाटते की यातुन फार काही सांगितले गेले. परंतु तसे नाही. आयपीसीसी, नासा सारख्या संस्था पूर्ण निखळ सत्य सांगत नाहीत. जागतिक आर्थिक परिषद, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व विश्व बँकेसारख्या प्रबळ वित्त संस्थांचा, अर्थव्यवस्थेचा त्यांच्यावर दबाव आहे.

जागतिक हवामान संघटनेच्या अहवालांनुसार व  पॅरिस करारात मानवजात वाचवण्यासाठी रोखली जावी म्हणून नमूद केलेली पृथ्वीच्या सरासरी तापमानातील २°सेची वाढ आॅगस्ट २०२० मधे झाली आहे. पृथ्वीच्या सरासरी तापमानात दर पाच ते आठ वर्षांत १° से ची अभूतपूर्व वाढ, ही वास्तव परिस्थिती पाहता मानवजातीचे फक्त २५ ते ३५ वर्षांत उच्चाटन होऊ शकते. जीवन रक्षणासाठी अतिशय क्रांतिकारक उपाय हवा आहे. कार्बन उत्सर्जन थांबवणे, हरितद्रव्याचा नाश व पृथ्वीचे लचके तोडणे रोखणे यासाठी उद्योगपूर्व शेतीयुगात तात्काळ परत जाण्याची गरज आहे.

यासाठी नरपड, डहाणू येथे कुंदन राऊत यांच्या शेतावर २५ - २६ डिसेंबर २०२१ ला नैसर्गिक शेती, चरखा, माती - बांबूच्या घरांचे शिबिर झाले. 

आता *शाश्वत जीवन कार्यशाळा* वर्धा (गोपुरी ) येथे दिनांक १२ मार्च ते १६ मार्च २०२२ दरम्यान ५ दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे.

१२ मार्च - पहाटे सगळे पोहचू . 
दिवसांचं नियोजन : रोज

 *सकाळ सत्र* 

६ ते ७ -  प्रार्थना, जलपान.
७ ते ९ - श्रमकार्य - नैसर्गिक शेती, बांधकाम

९ ते ९:३० - न्याहारी 
९:३० ते ११:३० - श्रमकार्य
११:३० ते १२:३० 

*दुपार सत्र*

१२:३० ते २ भोजन विश्रांती
४ ते ५:३० - 
व्याख्यान - चर्चा, शिवारफेरी, कताई, शेती चर्चासत्र.
५:३० ते ६:३० - सामूहिक खेळ
६:३० ते ८ - मुक्त वेळ
८ - भोजन

सार्वजनिक वाहनाने प्रवास करू. 
मोबाईल गरजे पुरता वापरू. 
प्रयत्न करूया मोकळे पणाने राहण्याचा, चरखा हातमाग अनुभवण्याचा. 

टीप:

१) श्रमकार्य, बांधकाम, शेती, स्वयंपाक मदत, परिसर सफाई.
२) तापमान वाढत आहे म्हणून डोक्याला बांधायला सुती रुमाल असावा.
३) मच्छर दाणी सोबत आणावी.

ही कार्यशाळा कशासाठी ?

शाश्वतता कशी साधता येईल, जेणेकरून अन्न सुरक्षा, वस्त्र (खादी, चरखा- हातमाग), निवारा स्थानिक संसाधने वापरून पर्यावरण पूरक घर.
हे आपण कार्यशाळेतून शिकणार आहोत. गांधीजी-विनोबांचे शाश्वत जीवनाचे विचार जाणून घ्यायला हवे. 

अशा कार्यशाळा - शिबिरे विविध विभागांत सातत्याने होणार आहेत. आपणही सहभागी व्हा.  संपर्क करा असे आवाहन श्री स्वप्नील अधिकारी :8793606927, कुंदन राऊत :
72766 13732 व ऐडवोकेट गिरीश राऊत - निमंत्रक, भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ दू. क्र. ९८६९०२३१२७ यांनी केले असुन ही माहिती जनतेपर्यत पोहचविण्यास मदतीचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments