Ticker

6/recent/ticker-posts

सावधान! 'हा' कीडा ठरणार जगाच्या विनाशाचं कारण? शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा*

*सावधान! 'हा' कीडा ठरणार जगाच्या विनाशाचं कारण? शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा*



शास्त्रज्ञांनुसार किड्यांच्या दोन नव्या प्रजातींचा (Two new species of killer hammerhead flatworms) शोध लागला आहे. या किड्यांची शक्ती खूपच घातक आहे. हे कीडे सध्यातरी बागांमध्ये आढळले आहेत. 
शास्त्रज्ञांनुसार किड्यांच्या दोन नव्या प्रजातींचा (Two new species of killer hammerhead flatworms) शोध लागला आहे. या किड्यांची शक्ती खूपच घातक आहे. हे कीडे सध्यातरी बागांमध्ये आढळले आहेत.
शास्त्रज्ञांनुसार किड्यांच्या दोन नव्या प्रजातींचा (Two new species of killer hammerhead flatworms) शोध लागला आहे. या किड्यांची शक्ती खूपच घातक आहे. हे कीडे सध्यातरी बागांमध्ये आढळले आहेत.

मुंबई, 03 फेब्रुवारी: एक संकट सरत नाही तोच दुसरं संकट येऊन उभं ठाकतं. शास्त्रज्ञांसमोर रोज एक नवीन आव्हान येत आहे. कोविडचं संकट (COVID-19 Pandemic) हे जगभरात पसरलं आणि मोठ्या विनाशाचं कारण ठरलं. प्रत्येकाला या संकटाचा सामना करावा लागला. आता पुन्हा एकदा असंच एक संकट येऊ घातलं आहे. जे माणसाच्या शरीराला सध्यातरी थेट काही नुकसान पोचवणार नाही. पण अशा परिस्थितीला जन्म देऊ शकतं. ज्यामध्ये आपल्या जीवनावर प्रभाव पडू शकतो.

शास्त्रज्ञांनुसार किड्यांच्या दोन नव्या प्रजातींचा (Two new species of killer hammerhead flatworms) शोध लागला आहे. या किड्यांची शक्ती खूपच घातक आहे. हे कीडे सध्यातरी बागांमध्ये आढळले आहेत. पण लवकरच या समस्येवर उपाय न शोधल्यास आपल्या किचनपर्यंत पोहोचून आपल्या आयुष्यावरही हे कीडे परिणाम करू शकतात. ही समस्या वाढण्याचं प्रमाण इतकं आहे की, या किड्यांचा शोध लागण्यानंतर काही दिवसांतच ते अन्य 3 देशांमध्ये सापडले आहेत.

कीडा नाही विनाश

या संकटाचं नाव आहे फ्लॅटवर्म (Flatworm). ज्याची लांबी फक्त 3 सेमी एवढी आहे. पण याच्या सर्वांत मोठ्या प्रजातीतीली किड्याची लांबी जवळपास 3 फूटांपर्यंत असू शकते. आत्ता फ्लॅटवर्म ब्रिटिश बागांमध्ये आढळले आहेत. पण शास्त्रज्ञांना शंका आहे की, हे जर वेगाने पसरले तर जैव विवधतेसाठी (Biodiversity of British gardens) धोका ठरू शकतात. रोपांच्या आयात निर्यातीत वर्मच्या 10 पेक्षा जास्त प्रजाती आशियामधून जगभरात फैलावत आहेत. फ्लॅटवर्मच्या नव्या प्रजाती फ्रान्स, इटली (France and Italy) आणि आफ्रिकेच्या बेटांवरही (Island near Africa) आढळल्या आहेत.


उष्णतेमुळे वाढणार संख्या

गांडूळ आणि गोगलगाय या किड्यांचा प्रमुख आहार आहेत. आत्तापर्यंत हे बागांमध्ये दिसून आले आहेत. पण या किड्यांचा प्रसार झाल्यास ते संपूर्ण शेतीचं नुकसान करू शकतात. एवढी त्यांची क्षमता आहे. संशोधकांचा दावा आहे की, जसजशी उष्णता वाढेल तसतसा या किड्यांचा त्रास वाढेल आणि एकाच वेळी हजारांच्या संख्येत बाहेर पडून संपूर्ण जमिनीवर यांचा हे किडे पसरतील. प्रोफेसर जीन-लू जस्टिन यांच्यानुसार, या प्रजाती खूप धोकादायक आणि आक्रमक आहेत. या किड्यांची क्षमता इतकी आहे की, लवकरच सगळीकडे पसरून आपलं साम्राज्य जगभरात स्थापित करतील. त्यामुळे शास्त्रज्ञांनी सर्वांना सावधानतेचा इशारा दिला आहे की तुम्हाला हा कीडा दिसल्यास तिथल्या तिथे त्याला मारून टाका. कारण हे नवीन संकट आपल्यावर कोणती वेळ आणेल, याची शाश्वती नाही.

साभार....

Post a Comment

0 Comments