Ticker

6/recent/ticker-posts

तेलंगणा राज्यात मिरची तोडा साठी गेलेल्या महाराष्ट्रातील दोन मजुरांचा मृत्यू!* *शेतमजुरांचा वाली कोणी आहे का?शेतमजूर संघटना गेल्या तरी कुठे?* *संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज*

🎫*तेलंगणा राज्यात मिरची तोडा साठी गेलेल्या महाराष्ट्रातील दोन मजुरांचा मृत्यू!*

🎏*शेतमजुरांचा वाली कोणी आहे का?शेतमजूर संघटना गेल्या तरी कुठे?*

🎄*संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज*

चंद्रपूर: जिल्हा प्रतिनिधी

आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करण्याची तयारी ठेवणाऱ्या शेतमजूरांवर आता प्राणास मुकावे लागण्याची पाळी सुद्धा ओढावली आहे.आधीच कोरोना-या महामारी ने व लाक डाऊन मुळे सर्व कामाच्या संधी हिरावल्या गेल्या आणि शेतमजुरांच्या उपासमारीची शृंखला सुरू झाली.यावर्षी लॉक डाउन ला काही प्रमाणात शिथिलता असल्यामुळे दर वर्षी प्रमाणे महाराष्ट्राच्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजूर मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात गेले आहेत.मात्र तेथिल शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व शेतकरी शेतमजूर यांच्या पिळवणकि मुळे महाराष्ट्रातील अनेक मजुरांना तेलंगणात आपले प्राण गमवावे लागत आहे.
   
नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या एका गावातील एका शेतमजुराचा तेलंगणा राज्यातील परकल बोरतांडा येथिल शेतकऱ्याच्या शेतात मृत्यू झाला. मात्र या घटनेचा प्रसारमाध्यमांनी कुठेही वाजागाजा केलेला नाही.घटना घडल्यानंतर संबंधित शेतकऱ्याकडील शेतमजूर परत गेले. त्यामुळे शेतकऱ्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेत मजूर पुन्हा कामावर नेले.या शेतमजुरां पैकी एका 36 वर्षीय शेतमजुराचा काल दिनांक 3 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला.ही घटना सुद्धा माध्यमांमध्ये बघायला मिळाली नसल्याने माध्यमांच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहेत.एखाद्या मोठ्या दिग्गजांचा मृत्यू झाला असता तर दिवस-रात्र ब्रेकिंग न्यूज बनवणाऱ्या माध्यमांनी शेतमजुरांच्या मृत्यूस काडीकचरा समजून नजर अंदाज केले आहे.तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील एका गावात घडलेली ही दुर्दैवी घटना असून तेथील जिल्हाधिकारी आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी यांनी दखल घेणे गरजेचे आहे.


देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे,आणि शेतीचा मुख्य कणा शेतमजूर आहे. शेतकरी आणि शेतमजूर हे नातं खूप अतूट आहे. शेतमजूर या प्रकारात चार प्रकारात मोडतात,पहिला जमीनदार किंवा जमीन मालकाचे सेवक म्हणून काम करणारे भूमिहीन मजूर, दुसरा इतर कोणत्याही शेतकऱ्याकडे पूर्णवेळ सेवा करणारा भूमिहीन मजूर,तिसरा स्वतःची थोडीफार जमीन असणारा पण शेती परवडत नसल्याने वर्षातील बहुतेक काळ दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करणारा मजूर,चौथा स्वतःची शेती कसून झाल्यावर वर्षातील काही काळ दुसऱ्याच्या शेतावर नोकरी करून पूरक उत्पन्न मिळवणारा शेतमजूर.यापैकी कोणत्याही प्रकारात मोडणाऱ्या शेतमजूर व्यक्तीला त्या सर्वांची समान वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प, बेभरवशाचे तसेच चढ-उताराची उत्पन्न, समाजातील खालच्या स्तरावरील जीवन, सातत्याने होणारी पिळवणूक, मागासलेले राहणीमान, सार्वत्रिक बेरोजगारी, कर्जबाजारीपणा इत्यादी .देशात सातत्याने होणारी दरवाढ किंमतवाढ ध्यानात घेता शेतमजुरांची वास्तव उत्पन्न हा कित्येक वर्षं कुंठित राहिलेले आहे असा आजपर्यंतचा निष्कर्ष आहे.
     स्वातंत्र्यानंतर शासनाने पहिल्या दहा वर्षात दोन शेतमजूर पाहणी समित्या या दोन्ही समित्यांना देशातील शेतमजुरांची परिस्थितीया दोन्ही समित्यांना देशातील शेतमजुरांची परिस्थिती अतिशय नाजूक आणि हलाखीची असल्याचे आढळले. मजुरांच्या संख्येत दरवर्षी लाखांची भर पडत आहे.या भरी चा फायदा जमीनदार शेतकरी घेत आहेत. शेत मजुरांकडून वेठबिगारी करवून घेतली जात आहे. त्यांना शासकीय दरानुसार मोबदला दिला जात नाही.भारतात 1975 पासून वेठबिगारी रद्द करणारा कायदा अमलात आला. मात्र या कायद्याची अंमलबजावणी आत्तापर्यंतही योग्य होताना दिसत नाही.त्यामुळे शेतमजुरांचे हाल होताना जिकडे-तिकडे पहावयास मिळत आहे.मात्र या अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहालाच नामशेष करण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे दुर्दैव आहे.


Post a Comment

0 Comments