Ticker

6/recent/ticker-posts

११ फेब्रुवारी रोजी पोंभूर्णा नगरपंचायत अध्यक्षाची निवड

११ फेब्रुवारी रोजी पोंभूर्णा नगरपंचायत अध्यक्षाची निवड

तालुका प्रतिनिधी
पोंभूर्णा: नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 19 जानेवारी रोजी घोषित झाला.मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी नगरपंचायत अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार ११ फेब्रुवारी रोजी अध्यक्षाची निवडणूक होणार आहे.
     
जिल्हाधिकारी यांनी २ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारुन छाननी करण्यात येणार आहे.याच दिवशी नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आलेल्यांची नावे सायंकाळी पाच वाजेपर्यंत सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येतील तर पीठासीन अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध अपिल दाखल करण्याचा कालावधी ७ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपासून ९ फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील. त्यानंतर नामनिर्देशन पत्राची यादी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल ११ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी दुपारी चार वाजेनंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अध्यक्षपद निवडणुकीकरिता विशेष सभा ११ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता होईल. 

यावेळी निवडणूक लढविणारे व उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविण्यात येईल. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुका होऊन दुपारी सव्वा बारा वाजता निकाल घोषित करण्यात येणार आहे. तसेच नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा याच दिवशी होणार आहे.या निवडणुकीकरिता पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी दीप्ती सूर्यवंशी आणि मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक काम पाहतील.

Post a Comment

0 Comments