Ticker

6/recent/ticker-posts

*चंद्रपूर भुषण आणि चंद्रपूर रत्न पुरस्कारासाठी आवेदन आमंत्रित* _*प्रथम वर्धापन दिनानिमित्त पार्थशर समाचारचा उपक्रम*

*चंद्रपूर भुषण आणि चंद्रपूर रत्न पुरस्कारासाठी आवेदन आमंत्रित*

*प्रथम वर्धापन दिनानिमित्त पार्थशर समाचारचा उपक्रम*


*रंजन मिश्रा, मुख्य संपादक,*
*जनवार्ता भारत डॉट कॉम*


चंद्रपूर:डिजिटल व्हिडिओ न्यूज आणि ऑनलाइन पोर्टल पार्थशर समाचार दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी आपला पहिला वर्धापन दिन साजरा करीत असुन अल्पावधीतच थेट मुंबई, ठाणे व नागपूर येथे आपले कार्यालय स्थापन करून पार्थशर समाचारने मैलाचा दगड पार केलाआहे.

आपल्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने पार्थशर समाचार चंद्रपूर येथे जन्मलेल्या अथवा चंद्रपूर ही कर्मभूमी असलेल्यांना चंद्रपूर भुषण तसेच चंद्रपूर रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असुन 1फेब्रुवारी 2022 पर्यंत नामांकने स्वीकारल्या जाणार आहेत.
ज्यांना आपले नामांकन पाठवायचे असेल त्यांनी parthsharsamachar@gmail.com ह्या ई मेल वर संपुर्ण माहिती पाठवावी असे आवाहन पार्थसर समाचार च्या वतीने माकरण्यात येत आहे.


पुरस्कारप्राप्त मानांकन निवडीसाठी पार्थशर न्यूजचे मुख्य संपादक *राजेश नायडू*, झी न्यूजचे चंद्रपूर प्रतिनिधी *आशिष अंबाडे*, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ प्रमोद काटकर* आणि रोटरीची माजी इनरव्हील अध्यक्ष *डॉ. विद्या बांगडे* ह्यांची 4 सदस्यीय समिती आलेल्या आवेदनांची पडताळणी करून निर्णय घेणार आहे. अधिक माहितीसाठी *पार्थशर न्यूजचे मुख्य संपादक राजेश नायडू यांच्याशी 7709032035 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.*

Post a Comment

0 Comments