Ticker

6/recent/ticker-posts

शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा* *संस्था सचिव सौ. साधनाताई अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न*

*शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा*



*संस्था सचिव सौ. साधनाताई अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न*

चामोर्शी:- सुखसागर झाडे. 

   स्थानिक शरदचंद्र पवार कला महिला  महाविद्यालय चामोर्शी येथे कोव्हिड19 नियमाचे तंतोतंत पालन करीत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सवीय प्रजासत्ताक ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चे सचिव सौ. साधनाताई अतुलभाऊ गण्यारपवार, संस्था कोषाध्यक्ष माधुरीताई बोनगीरवार, नितीन पोशेटिवार, गण्यारपवार मॅडम,उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थितीत  प्रा.सुखसागर झाडे,प्रा.निनाद देठेकर,प्रा.पल्लवी कोटांगले, प्रा. ललिता वसाके,सुनिल आभारे, नितेश पोरटे, भावना सुर,संजय गडकर, भावना चांदेकर,आशिष मेश्राम,लोभेश गोर्लावार,तसेच बाळुभाऊ तानले उपस्थित होते.  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयीन महिला कर्मचारी यांनी तिरंगा ची सांस्कृतिक वारसा जोपासणारी उत्कृष्ट सुबक रांगोळी साकारली.   ध्वजारोहण  प्रसंगी  संविधान निर्माते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच राष्ट्रपिता म.गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. संस्था सचिव साधनाताई अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन प्रा.सोनी आभारे यांनी केले. सामूहिक राष्ट्रगीत व झेंडा गीत गात मानवंदना वाहिले आणी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.   
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण कर्मचाऱ्यांनी मोलाचं योगदान केले.

Post a Comment

0 Comments