Ticker

6/recent/ticker-posts

माधवबाग ही संस्‍था खरी सामाजिक संपत्‍ती: आ. सुधीर मुनगंटीवार* *दशकपूर्ती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न*

*:माधवबाग ही संस्‍था खरी सामाजिक संपत्‍ती: आ. सुधीर मुनगंटीवार*



 *दशकपूर्ती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न*


मधुमेह आणि हृदयरोग यासारख्‍या आजारांबाबत उपचार व जनजागृती यासाठी कार्यरत माधवबाग सारख्या संस्‍था सामाजिक संपत्‍ती असल्‍याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


दिनांक २६ जानेवारी प्रजासत्‍ताक दिनाचे औचित्‍य साधुन माधवबाग आणि रोटरी क्‍लब यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, हृदयरोग आणि मधुमेह या आजारांसंदर्भात माधवबागच्‍या माध्‍यमातुन जे कार्य चालु आहे ते अतुलनीय आहे. चंद्रपूरची माधवबाग आरोग्‍यसेवेची दशकपुर्ती करून अकराव्‍या वर्षात पदार्पण करीत आहेत. २६ जानेवारी हा दिवस साजरा करण्याचा दिवस नसून संकल्प दिवस आहे. यासाठी ‘मधुमेह मुक्‍त संकल्‍प यात्रा’ आणि ‘सेव्‍ह माय हार्ट मिशन’ हे अभियान राबविण्‍यात येत आहे ही अभिनंदनीय बाब आहे. ११०० लोक मधुमेह मुक्‍त करणे हा संकल्‍प निश्‍चीतच प्रेरणादायी आहे. मी अर्थमंत्री असताना चंद्रपूर जिल्‍हयात प्राथमिक आरोग्‍य केंद्रांच्‍या इमारती उभारल्‍या व त्‍या माध्‍यमातुन आरोग्‍य व्‍यवस्‍था उत्‍तम करण्‍यावर भर दिला. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय तसेच कॅन्‍सर हॉस्‍पीटलची निर्मीती केली. सर्वसामान्‍य गरीब नागरिकांना उपचारासंदर्भात आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये यासाठी आरोग्‍य क्षेत्रात आपल्‍यापरिने योगदान देण्‍याचा मी प्रयत्‍न केला. माधवबागच्‍या रजतजयंती निमीत्‍त होणा-या कार्यक्रमात मी निश्‍चीतपणे उपस्थित राहील, त्‍यावेळी माधवबागचे कार्य अधिक उत्‍तुंग झाले असेल असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.

 या संस्‍थेच्‍या कार्याला आपण शुभेच्‍छा देत असल्‍याचे आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. कार्यक्रमाचे प्रस्‍ताविक माधवबागचे संचालक डॉ. लक्षमीनारायण सरबेरे यांनी केले. माधवबागतर्फे मधुमेह मुक्‍त संकल्‍प यात्रा आणि सेव्‍ह माय हार्ट मिशन या उपक्रमांची माहिती त्‍यांनी यावेळी दिली. यासाठी आरोग्‍य मित्रांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून येत्‍या वर्षभरात ११०० मधुमेह रूग्‍ण मुक्‍त करणार असल्‍याचा संकल्‍प त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. या कार्यक्रमाला भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. प्रिती सरबेरे, डॉ. उमेश पनवेलकर, सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश धारणे, रोटरी क्‍लबचे श्रीकांत रेशीमवाले, अविनाश उत्‍तरवार, धनराज कोवे, डॉ. भट्टाचार्य, रविंद्र वायकर, अजय जयस्‍वाल, अरूण तिखे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments