Ticker

6/recent/ticker-posts

आमदारांच्या जावयाने सुरजागड प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला केली बेद्दम मारहाण*

*राष्ट्रवादी आमदारांच्या जावयाने सुरजागड प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला केली बेद्दम मारहाण*


गडचिरोली.(अहेरी):- सुखसागर झाडे


    गडचिरोली जिल्ह्यात जेंव्हा पासून सुराजगड प्रकल्प कार्यान्वित झाला होता तेंव्हा पासूनच प्रकल्पाच्या जवळ पासच्या अनेक गावातल्या नागरिकांनी या प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कित्येक वेळा आंदोलने केलेली असून सुरजागड प्रकल्पाच्या विरोधात अनेक तक्रारी महाराष्ट्र राज्य सरकार,गडचिरोली जिल्हा प्रशासन,पोलिस प्रशासन कडे देण्यात आलेल्या आहेत.

मोठ्या प्रमाणात विरोध होत असतांनाही राजरोसपणे दररोज अवैध उत्खनन करून करोडोंचा खनिजमाल शेकडो गाड्या द्वारे जिल्ह्याबाहेर नेण्यात येत आहे.या प्रकल्पातून उत्खननात निघालेल्या लोहदगडाची अवैध वाहतुक, ही कोटींच्या घरात असल्यामुळे, या धंद्यात मोठे राजकीय नेते,बलाढ्य उद्योगपती शामिल असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिली जात आहे.या अवैध धंद्यांवर अनेक राजकारणी नेते मंडळी ,आपला राजकीय भविष्य चमकवण्यासाठी राजकीय आर्थिक वसुली करून, आपला राजकीय भविष्य दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या खनिज चोरीच्या उद्देशाने सुरजा गड प्रकल्प अधिकारी व वाहतूकदार,आणि राजकीय नेत्यांचे आर्थिक देवाणघेवाण करण्यामध्ये काही दिवसापासून मतभेद निर्माण झाल्याचे सांगितले जात होते.या प्रकल्पातून अवैध मार्गाने वाहतूक करणाऱ्या लोकांनी, गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय लोकांना आर्थिक प्रलोभन दाखवून,आणि पोलिस विभागाशी संगनमत करून, सरकारच्या खनिज विभागाला करोडोंच्या चुना लावलेला असून, मोठा आर्थिक मलिंदा लाटलेला आहे.

अशाच प्रकारे एखाद्या आर्थिक देवाण घेवाण संबंधात आलेल्या मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार बाबा आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर यांनी सूरजागड प्रकल्प अधिकारी अतुल खाडिलकर यांना,आलापल्ली येथे त्यांच्या राहत्या घरात घुसून बेद्दम मारहाण केल्याची घटना 24/1/2022 रोजी रात्री बारा वाजता च्या सुमारास घडली आहे.

या विवादात राजकीय आर्थिक वसुली करण्याचा प्रयत्न करीत, बाचाबाची झालेली असून,करोडो रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी राजकीय दबावातून मारहाण केल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात लोकांमध्ये होतांना दिसत आहे.

सदर मारहाण आपल्या जावयाने केल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी काल दिवसभर प्रकरण सेटल करण्याचा प्रयत्न केला होता हे विशेष….

सदर घटनेची सविस्तर माहिती पोलिस सूत्रांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता,राष्ट्रवादीचे नेते ऋतुराज हलगेकर,यांनी आपला भाऊ जयराज,आणि भोजराज यांच्या सह इतर 5/6लोकांनी, सूरजागड प्रकल्प अधिकारी अतुल खाडिलकर यांना आलापल्ली येथे राहत्या घरी जाऊन त्यांच्या घराचा समोरील दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला होता.परंतु अतुल खाडिलकर यांनी घरातून कोणताच प्रतिसाद न दिल्याने ऋतुराज हलगेकर व त्यांच्या सोबत आलेले 5/6लोकांनी खाडिलकर यांच्या घराचा दरवाजा लाथाबुक्क्यांनी तोडून घराच्या आता जाऊन सामानाची नासधूस करीत अतुल खाडिलकर यांना जिवे मारण्याची धमकी देत बेद्दम मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली असून, त्या तक्रारीवरून ऋतुराज हळगेकर,जयराज हलगेकर, व इतर लोकांवर भादवी कलम 452,427,323,143,147,504 व 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अहेरी पोलिस निरीक्षक शाम गव्हाणे यांनी दिली आहे.

सूरजागड प्रकल्पाचे अधिकारी अतूल खाडिलकर यांच्या मोबाईल वर संपर्क करून जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांनी, मी सध्या मारहाण झाल्याने अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सद्या माझी मानसिकता बरोबर नसल्यामुळे, मी योग्य वेळी संपूर्ण माहिती जगजाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments