Ticker

6/recent/ticker-posts

ब्रम्हपुरी तालुक्यात रंगमोचन फाट्यावर कार व टॅक्टर चा मॊठा अपघात* *अपघातात आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू तर अतुलभाऊ गण्यारपवार गंभीर जखमी*

*ब्रम्हपुरी तालुक्यात रंगमोचन  फाट्यावर कार व टॅक्टर चा मॊठा  अपघात*

*अपघातात आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू तर अतुलभाऊ गण्यारपवार गंभीर जखमी*

गडचिरोली:-सुखसागर झाडे

ब्रम्हपुरी:-गडचिरोली- चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार हे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांचे सोबती आनंद गण्यारपवार हे जागीच ठार झाले.

आज सकाळच्या सुमारास ब्रम्हपुरी मार्गे नागपूरला जात असताना ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई गावाजवळील रनमोचन फाट्याजवळ कार क्रमांक MH 33 v 245 ने समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात कार मधील आनंद गण्यारपवार जागीच ठार झाले तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची सविस्तर माहिती ब्रम्हपुरी पोलिसांकडून जाणून घेतली असता, आनंद गण्यारपवार हे जागीच गतप्राण झाले असून अतुल गण्यारपवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे पोलिस निरीक्षक रोशन यादव यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments