Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा- पत्रकारांची मागणी


पत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा पत्रकारांची मागणी

राजुरा, 28 जाने. : राजुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज संकुल चौकात अज्ञातांकडून दैनिक नवभारतचे तालुका प्रतिनिधी यांच्यावर क्षुल्लक कारणावरून जिवघेणा भ्याड हल्ला करण्यात आला. हि दुर्दैवी घटना 25 जानेवारी ला दुपारी घडली.

सविस्तर वृत्त असे की, आज दुपारी दैनिक नवभारतचे तालुका प्रतिनिधी स्वघरी जात असताना दुचाकीला दुचाकीची ठोस लागली या क्षुल्लक कारणावरून अकारण शिवीगाळ करत पंचायत समिती जवळील छत्रपती शिवाजी महाराज संकुल चौकात अज्ञात पाच ते सहा युवकांनी बॅटने व लाथाबुक्क्यांनी जीवघेणा भ्याड हल्ला चढविला. यात पत्रकाराला जबर दुखापत झाली आहे. राजुरा पोलीस स्टेशन येथे भांदवि 1860 अन्वये कलम 294, 324, 34, 392, 506 गुन्हा नोंदविला असून बॅटने मारहाण करणाऱ्या युवकाचे नाव सोहेल शरफुदिन असल्याचे कळले आहे. तसेच पत्रकारांच्या खिशातील बारा हजार रुपये पळविले. या घटनेमुळे पत्रकारिता क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली असून या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला जात आहे.

शहरातील चौकात वाहतूक पोलीस नसल्याने सुसाट दुचाकी चालविणाऱ्या तरुणांना कुठलेच भय राहिले नाही. सदर चा हल्ला हा केवळ दुचाकीला दुचाकी ठोस लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद चिघळला. त्याचप्रमाणे तालुक्यात अवैध धंदे फोफावत असून वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकार बांधवांवर भविष्यात यासारखे जीवघेणे हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भरदिवसा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर हल्ला होतो तिथे सामान्य माणसाचे काय? हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. याकरिता प्रशासनाने गांभीर्याने पाऊले उचलणे गरजेचे आहे. 

यामुळे पत्रकार आपल्या जीवावर बेतून वृत्त संकलन करून जनसामान्यांचा आवाज उठवित असतो. मात्र पत्रकारांना सुरक्षा कवच प्रदान करण्यात शासन-प्रशासनाने तातडीने पाऊले उचलणे गरजेचे असून संबंधित गुंडप्रवृत्तीच्या अज्ञात मारेकऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी पत्रकार बांधव करीत आहेत.

Post a Comment

0 Comments