Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव ग्रामपंचायतीला तक्रारींचे ग्रहण : विकासकामे खोळंबली, सहा महिन्यात सहा ग्रामसेवकांची बदली*


 *नांदगाव ग्रामपंचायतीला तक्रारींचे ग्रहण : विकासकामे खोळंबली, सहा महिन्यात सहा ग्रामसेवकांची बदली*


*विजय जाधव*


नांदगाव प्रतिनिधी

       तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतचे सरपंच,सचिव ग्रामपंचायत कमिटी, शासकीय स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ गावाच्या विकासासाठी घेत आहेत. परंतु मूल तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेली बहुचर्चित नांदगाव ग्रामपंचायत याला अपवाद ठरलेली दिसून येत आहे. विद्यमान ग्रामपंचायत कमिटीच्या कार्यकाळात पाच ग्रामसेवक बदलले असून सद्यस्थितीत एका छोट्याश्या बोंडाळा खुर्द येथील ग्रामसेवकाच्या खांद्यावर नांदगाव सह तीन ग्रामपंचायतच्या डोलारा आहे. यात बोंडाळा बुद्रुक, नांदगाव, बोंडाळा खुर्द या गावांचा समावेश आहे. प्रभारी ग्रामसेवक मासिक सभेच्या पलीकडे ग्राम विकास कसा करेल हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित आहे. नांदगावला ग्रामसेवकाची आवश्यकता आहे. नांदगाव साठी ग्रामसेवक का दिला जात नाही? अशी मागणी ग्रामपंचायत कमिटी का करीत नाही? आणि पंचायत समिती स्थायी ग्रामसेवक का देत नाही? याला जबाबदार कोण? पंचायत समिती की ग्रामपंचायत, याचे उत्तर जनतेला अजूनही मिळाले नाही.

       सद्यस्थितीत नांदगाव ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच व उपसरपंच मागील तक्रारींचा पाडा वाचण्यात धन्यता मानत आहेत. मागील ग्रामपंचायत कमिटी सुद्धा विद्यमान ग्रामपंचायत कमिटी कशा पद्धतीने चुकीचे नियोजन करीत आहे व भ्रष्टाचार करीत आहे, याबाबतच्या तक्रारी संबंधित विभागाला करीत असल्याचे दिसून येत असल्याने एकंदरीत नांदगाव ग्रामपंचायत तक्रारींच्या चक्रव्युहात अडकल्याचे दिसून येत आहे. गावात लाऊड स्पीकर लावून मागील ग्राम पंचायत कमिटीच्या बोगस कामांचा उल्लेख करून नामोहरम करण्याच्या प्रयत्न करताना दिसत आहे. तर विद्यमान ग्रामपंचायत विराजमान पदाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या बोगस कामांच्या अनेक तक्रारी जुनी ग्रामपंचायत कमिटी अर्थातच विरोधी बाकावरील पदाधिकारी करीत असल्याने एकंदरीत तक्रारींच्या पाऊलवाटेने नांदगाव ग्रामपंचायत चा प्रवास सुरू असल्याचे दिसून येत आहे.या मुळे ग्रामपंचायतीचा विकास खुंटला असून वीस वर्षापासून या गावात बीपीएलची यादी सुद्धा नाही.वीस वर्षापासून बीपीएलची यादी नसल्यामुळे येथील सर्व लाभार्थ्यांना व गरजवंतांना सर्व योजनांपासून वंचित रहावे लागले आहे.ही बाब गंभीर स्वरूपाची असून याकडे विद्यमान ग्रामपंचायतीने तरी लक्ष देण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments