Ticker

6/recent/ticker-posts

चाईल्ड लाईन चंद्रपुर जा सतर्कतेने थांबला बालविवाह*

 *🥤 चाईल्ड लाईन चंद्रपुर जा सतर्कतेने थांबला बालविवाह*


पोंभुर्णा: प्रतिनिधी


लहान वयात मुलांची लग्ने झाल्याने त्यांच्या आरोग्यावर, मानसिक विकासावर आणि आनंदी जीवनावर परिणाम होतो. लहान वयात लग्न केल्याने संपूर्ण समाजात मागासलेपणा येतो. जी शेवटी समाजाच्या प्रगतीत अडथळा ठरते. कायद्यात लग्नाचे वयही निश्चित करण्यात आले आहे. जर मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असेल, तर अशा विवाहाला बालविवाह म्हटले जाईल.

      पोंभुर्णा तालुक्यातील एका गावातअल्पवयीन बालिकेचा बालविवाह दिनांक 20 जानेवारी 2022 ला होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांक1098 वर मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे चाइल्ड लाइन चंद्रपूर संचालिका सौ नंदाताई अल्लूरवार व सरचिटणीस प्रा.प्रभावती मुठाळ यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. यानंतर चाईल्ड लाईन ने संबंधित ग्रामपंचायत, शाळा आणि अंगणवाडी केंद्र येथून बालिकेच्या व याबाबत ठोस पुरावा प्राप्त केला. संबंधित पुराव्याच्या आधारे जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर यांनी पोलीस स्टेशन ला संपर्क साधून त्यांना सदर प्रकरणाबाबत माहिती दिली. नंतर लगेच चाइल्ड लाइन टीमने लग्नमंडप गाठले व पोलिसांच्या सहकार्याने बालिकेच्या घरी जाऊन बालविवाह थांबविण्याची कार्यवाही केली. आणि बालिकेचे व पालकांचे समुपदेशन करून त्यांना बाल कल्याण समिती चंद्रपूर यांच्यासमोर उपस्थित केले.

==================

*वेळेवर पोहोचले पोलीस अधिकारी व चाईल्ड लाईन टीम*

==================

घटनास्थळी पोलिस स्टेशन उमरीचे ठाणेदार कुकडे साहेब व त्यांचे सहकारी, चाईल्ड लाईन चंद्रपूर समन्वयक अभिषेक मोहुरले, समूपदेशिका दिपाली मसराम, टीम मेंबर चित्रा चौबे, प्रणाली इंदुरकर आदी उपस्थित होते. तसेच सदर प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी चंद्रपूर चाईल्ड लाईन  मेंबर रेखा घोगरे, प्रदीप वैरागडे, कल्पना फुलझेले, नक्षत्रा मुठाळ आदींनी सहकार्य केले.

*चाईल्ड लाईन चंद्रपूरचे आव्हान*

==================

जिल्ह्यात होत असलेले बालविवाह संदर्भात माहिती तसेच काळजी व संरक्षणाची गरज असणारे 0 ते 18 वयोगटातील बालकांना मदत करण्याकरिता 1098 चाईल्ड लाईन या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन चाईल्ड लाईन ने केले आहे. बालविवाह संदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तींची नाव पूर्णता गुपित ठेवण्यात येते अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments