Ticker

6/recent/ticker-posts

उद्यापासून घरपोच मिळणार दारू

उद्यापासून घरपोच मिळणार दारू

  • मार्गदर्शक सूचना जारी

  • परवानाधारक व्यक्तीला दारू घरपोच देण्याची जबाबदारी दुकानदाराचे असेल.

  • घरपोच दारू डिलिव्हरीसाठी डिलीवरी बायला उत्पादन शुल्क विभागाचे ओळखपत्र

  • त्याला मास्कचा वापर करणे आणि शनि टायझर ने हात स्वच्छ निर्जंतुकीकरण बंधनकारक

वैनगंगा न्यूज नेटवर्क
दि.१३मे२०२०

मुंबई: दारू दुकानासमोरील मध्य प्रेमींची गर्दी टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने घरपोच दारूची योजना आखली आहे. फक्त मद्य पिणाचा परवाना असलेल्या व्यक्तीलाच घरपोच दारू पुरविली जाणार आहे.
      जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्तांच्या मान्यतेने ज्या भागात दारूची दुकाने सुरू आहेत, अशा भागात 14 मे पासून दारूची होम डिलिव्हरी सुरु होईल. गुरु ना च्या साथीत प्रतिबंधित म्हणून जाहीर झालेल्या कोणत्याही भागात घरपोच दारू दिली जाणार नाही. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी मंगळवारी दिली. फक्त परवानाधारक व्यक्तींना दारूची घरपोच सेवा मिळणार आहे. दारू पिण्याचा परवाना ऑनलाइन उपलब्ध आहे. तसेच मद्यविक्री दुकानात सुद्धा दारूचा परवाना मिळेल असेही उमाप यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments