Ticker

6/recent/ticker-posts

भिक्षी येथील इसम नदीत बुडाला, वैनगंगा नदी ने केले रुद्र रूप धारण- दोन महिन्यात तिघांचा बुडून मृत्यू

भिक्षी येथील इसम नदीत बुडाला, वैनगंगा नदी ने केले रुद्र रूप धारण- दोन महिन्यात तिघांचा बुडून मृत्यू

वैनगंगा न्यूज नेटवर्क 
      पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव आणि चामोर्शी तालुक्यातील भिक्षी मालच्या मधुन वाहणाऱ्या वैनगंगा नदीने रौद्र रूपधारण केले असून दोन महिन्यात या नदीने तिघांचा बळी घेतला आहे.
      प्राप्त माहितीनुसार काल सायंकाळच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील भिक्षी माल येथील कायमचे रहिवासी सुभाष शेंडे वय 45 वर्ष हे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वैनगंगा नदीत स्वतःच्या नावेने जुनगावकडे येण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. मात्र मृतक सुभाष ची नाव (डोंगा) ही सभोवताल पाणी असलेल्या एका मोठ्या दगडाला लागून उभी दिसली. मृतकाच्या डोंगा जर मध्यंतरी पाण्याच्या मधील दगडावर येऊन थांबला होता. तर मग डोंगा पलटी झाला नाही. मग त्याने आत्महत्या केली असावी का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
      मृतकाच्या पत्नीने चामोर्शी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी शोध मोहीम राबविली . चामोर्शी वरून शोध पथकाला पाचारण करण्यात आले. शोध पथकाच्या जवळजवळ चार तासाच्या अथक परिश्रमानंतर सुभाष याचा मृतदेह भिक्षी नदीघाटावर आढळून आला. पोलिसांनी ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता चामोर्शि ला पाठविले.
      दरम्यान पोलिसांनी नदीकाठील शेतकऱ्यांच्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून निर्दोष लोकांना पोलिसांनी पकडून नेल्यामुळे पोलिसांप्रती तीव्र नाराजी पसरली आहे.
     या आधी  याच नदीघाटावर दीड महिन्यापूर्वी दोघांचा बळी गेला आहे. मागील वर्षी याच घाटावर पुन्हा दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. एका वर्षात या पैनगंगा नदीने पाच जणांना गिळंकृत केले आहे. त्यामुळे वैनगंगा रौद्र रूप धारण करीत आहे की काय अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments