Ticker

6/recent/ticker-posts

गडचिरोली जिल्ह्यात उद्यापासून तेंदू संकलनाला सुरुवात

गडचिरोली जिल्ह्यात उद्यापासून तेंदू संकलनाला सुरुवात
खळबळजनक न्यूज नेटवर्क

चंद्रपूर-गडचिरोली हे जिल्हे आदिवासीबहुल असून येथे आदिवासी बांधव मोठ्या संख्येने राहतात. आदिवासी व बिगर आदिवासी हजारो मजूर दरवर्षी उन्हाळ्यात जंगलातील तेंदूपत्ता चे संकलन करून ते फळीवर विक्री करतात. यातून मजुरांना बऱ्यापैकी आर्थिक मदत मिळते. तेंदू हंगाम हा वार्षिक आर्थिक बजेट ठरविणारा महत्त्वाचा हंगाम आहे. तेंदूपत्ता हंगामातून मिळणाऱ्या उत्पन्नातून पाच ते सहा महिन्याचा मजुरांचा बजेट होत असते.
       कमी दिवसात भरपूर रोजगार देणारा व बऱ्यापैकी आर्थिक मिळकत मिळवून देणारा हंगाम म्हणून तेंदूपत्ता संकलन हंगामा कडे पाहिले जाते. दरवर्षी गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात हा हंगाम एप्रिल महिन्यापासून सुरू होत होता. मात्र यावर्षी कोरोणाच्या संसर्गामुळे व जनसंचार बंदीमुळे हा हंगाम लांबणीवर गेला.
     अशा परिस्थितीतही चामोर्शी तालुक्यातील काही गावांमध्ये उद्यापासून तेंदू संकलनाला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून कळते आहे. भीक्षी माल येथील तेंदु फळी सुरू होणार म्हणून आजच मजुरांनी जंगल गाठले. त्यामुळे या गावात कल्लोळ निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले. बाहेर राज्यातून आलेले मजूर संस्थात्मक विलगीकरणात असताना तेंदु संकलन सुरू करणे म्हणजे विलगीकरणात असणाऱ्या मजुरांचे शोषण करणे आहे. त्यांनाही या रोजगारात सहभागी होण्यासाठी व रोजगार मिळवून कुटुंबाचा गाडा चालवण्यात करिता वनविभागाने काही दिवस तेंदू संकलन केंद्र बंद ठेवावे, असे मत मजुरांनी व्यक्त केले. भीक्षीमाल हे गाव हळदी माल ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी विलगीकरणातील मजुरांची सुट्टी झाल्याशिवाय फळ्या चालू करू नये अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments