Ticker

6/recent/ticker-posts

◼️पोंभूर्णा येथे सुगंधित तंबाखूवर धाड◼️ ▪️एल.सी.बी.पोलिस पथकाची कारवाई

◼️पोंभूर्णा येथे सुगंधित तंबाखूवर धाड◼️
▪️एल.सी.बी.पोलिस पथकाची कारवाई 
वैनगंगा न्यूज नेटवर्क

पोंभुर्णा:चंद्रपुर गुन्हे शाखा पोलीस  विभागाच्या गुप्त कारवाईत आज शुक्रवार ला पोंभुर्णा येथील सुगंधित  तंबाखू व्यापारी सचिन नानाजी लेक्कलवार यांच्या शास्त्रीनगर वार्ड न.14 येथील राहते घरात एल. सी.बी.पोलिस पथक चंद्रपुरने धाड टाकुन 33 हजार रुपयाचे  मुदेह माल 10 पॉकेट शिल्व्हर व 500 ग्रॅम चे क्रेज बॉग सुगंधित तंबाखू जप्त केला. यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

पुढिल कारवाई अन्न व औषध, प्रशासन करित आहे.

महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षांपासून सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री वर बंदी घातली आहे. पण पोंभुर्णा तालुक्यात व शहरात सुगंधित तंबाखू ची खुलेआम तस्करी होत होती . याची  गुप्त माहिती एल.सी.बी.पथकाला मिळाली त्यांनी पोंभुर्णा येथे धाड टाकून सिल्वर पाकेट व क्रेज बॅग असा  एकुण ३३ हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.. सचिन नानाजी लेक्कलवार असे आरोपीचे नाव असून तो मागील अनेक दिवसांपासून सुगंधित तंबाखू ची तस्करी करत होता . आज एल.सी.बी.ने त्याच्या मुसक्या आवळल्या. सदर कारवाई चंद्रपुर एल.सी.बी.पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.महेंद्र बुजाडे, मनोज रामटेके,अविनाश दुशमवार,कुंदन वाढई यांनी केली आहे. पुढिल तपास अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी करित आहे.

Post a Comment

0 Comments