Ticker

6/recent/ticker-posts

*⭕पी एम किसान योजनेच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित* l pm kisan yojna l Chandrapur l Maharashtra l India l




पोंभुर्णा: प्रतिनिधी-
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पीएम किसान योजना अमलात आणली. यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासोबतच माहिती मिळवण्यासही प्रशासनाला कामाला लावले होते. असे असले तरी पोंभूर्णा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही आलेली नाही.
तांत्रिक चुकांसह महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे जिल्हा प्रशासनाकडे निधी पडून असताना देखील तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेला नाही. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला आहे.
जूनगाव येथील तुकाराम चापले या अल्पभूधारक शेतकऱ्याला आतापर्यंत केवळ एकदाच २०००रू. हजार रुपये मिळाले होते. त्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही जमा झालेली नाही. असे एकच शेतकरी नसून तालुक्यातील प्रत्येक गावात अनेक शेतकरी या लाभापासून वंचित असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments