Ticker

6/recent/ticker-posts

*स्पर्धा परीक्षा हे दिव्यकार्य, तितकेच दाहकही. - योगेश धोडरे*- *शिवाजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.*



*स्पर्धा परीक्षा हे दिव्यकार्य, तितकेच दाहकही. - योगेश धोडरे*- *शिवाजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.*
राजुरा (प्र.)
        प्रत्येकाला स्पर्धा परीक्षेचे आकर्षण किंवा वेध लागत जरी असले तरी ते सहजसाध्य नाही परंतु अश्यक्यही नाही. ते दिव्यकार्य व तितकेच दाहकही असून मेहनतीची तयारी, ध्येय निश्चिती, वेळेचे नियोजन, उत्तम मार्गदर्शन व चांगल्या पुस्तकांच्या अभ्यासाने महाविद्यालयीन जीवनातूनच तयारी केल्यास यश नक्कीच मिळेल असे प्रतिपादन समाज कल्याण वसतिगृह गृहपाल योगेश धोडरे यांनी केले. ते शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व बक्षीस वितरण कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री वारकड सर, तर उपप्राचार्य श्री खेरानी, प्रा. आत्राम, प्रा. गेडाम, संजीवनी फौंडेशन चे राजेश बसवेश्वर हजारे विस्तार समिती अध्यक्ष, ईजाज इस्माईल शेख
विस्तार समिती उपाध्यक्ष
 यांची प्रमुख उपस्थिती होती.
             या कार्यक्रमात संजीवनी फौंडेशन ने घेतलेल्या सामान्य ज्ञान परीक्षाचे बक्षीस वितरण करण्यात आले.  
सर्व अतिथींनी पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आत्राम, संचालन सुरज पचारे, तर आभार साक्षी राऊत. यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी व संजीवनी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments