Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे भव्य मानव विकास शिबिर संपन्न l manav vikas l human development



प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा व प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव मोरे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रोटरी क्लब चंद्रपूर यांच्या सौजन्याने ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे मानव विकास शिबिराचे आयोजन दिनांक 10 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.


या शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती अलकाताई आत्राम या होत्या तर, प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुलभा पिपरे, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर आसावरी देवताळे, बालरोग तज्ञ डॉक्टर सोनाली कपूर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शिबिराला सर्व वैद्यकीय अधिकारी, उपेंद्र अंतर्गत सर्व सीएचओ, आरोग्य सेविका,आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, उपस्थित होते.


या शिबिरामध्ये स्तनदा माता, गरोदर माता व दोन वर्षातील बालके, यांना मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी राजगिरा लाडू, पोषक आहार मुलांना व मातांना देण्यात आला.अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदेश मामीडवार यांनी दिली आहे.





Post a Comment

0 Comments