Ticker

6/recent/ticker-posts

एटापल्ली - मल्लमपाड आमहत्या प्रकरणी केलेले आरोप बिनबुडाचे l gadachiroli l etapalli l



पक्षाच्या नावाने कार्यकर्त्यांची अशीही बनावाबनवी ?




👉 पावसाळा सुरू झाला की बेडक ओरडतात.. तसे निवडणुका तोंडावर आल्या की....


गडचिरोली : विशेष प्रतिनिधी दि.10/9/2022: - गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील मल्लमपाड येथील नामे अजय दिलराम टोप्पो यांनी १ सप्टेंबर २०२२ रोजी आत्महत्या केली . टोप्पो याच्या आत्महत्येस जिल्हाधिकारी संजय मिना ' गडचिरोली हे जबाबदार असून त्यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे
गडचिरोलीच्या एका कार्यकर्त्यानी केला असता जिल्हाधिकारी संजय मिना यांनी आपल्या खुलास्यात म्हटले आहे की "सदर वृत्त हे चुकीचे असून दिशाभुल करणारे आहे ". परंतु प्रत्यक्ष पाहणी केली असता एटापल्ली तालुक्यातील पुसलगोंदी मंडल अधिकारी यांच्या अहवालानुसार टोप्पो यांचेकडे शेतजमीन नाही तो शेतकरीच नाही तसेच मृत्यु व्यक्ती हा कर्जबाजारी नाही . 


सदर व्यक्ती हा उरव समाजाचा आहे . सुरजागड लोह प्रकल्प कंपणीत कामगार यादीत नाही . तसे असते तर सुरजागड लोह प्रकल्प यांना अश्या प्रकारचे मजुर सापडले किंवा आत्महत्या केली तर त्यांना कंपणी तर्फे तात्काळ मदत घ्यावी अश्या सुचना दिल्या आहेत . परंतू तशा प्रकारच नाही . सदर प्रकरण घरगुती वादातुन घडल्याचे पोलिस अहवालात दिसून येते. 


वनहक्क पट्टा मिळविण्यासाठी सदर व्यक्ति आदिवासी समाजाचा पाहीजे . स्थालांतरित असल्यास संबाधित राज्य शासनाकडून अर्जदारांचा वडील किवा आजोबाना जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे . अशा प्रकार घडलाच नाही . 


सदर वृत्त हे चुकीचे व अर्थहिन असल्याचे जिल्हाधिकारी संजय मिना यांनी सांगीतले . पक्षाच्या नावाने आपला गोरखधंदा चालविणारे नेते नव्हेत कार्यकर्ते या जिल्हयात आहेत . अश्याच एका महाभागाने पुलखल - पारडी रेतीघाट प्रकरणात खोटी पेपरबाजी करणे हे कश्यासाठी हे येथील नागरिकांना कळत नाही काय? सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील आयसियु विभाग बंद आहे विधान सभेत आमच्या पक्षाच्या आमदारानी सदर प्रकरणाला वाचा फोडाल्यामुळे आयसियु विभाग सुरु झाले असा खोटा कांगावा करणारे काही राजकारणी करतात तरी का?? पावसाळा सुरू झाला की बेडकांचे आवाज ऐकायला मिळतात तसे निवडणुका तोंडावर आल्या की.. राजकारणी लोकांचे भोंग वाजायला सुरुवात होते. विकास कामे करण्यासाठी महत्त्वाचे काम करणारे कंत्राटदारांकडूनही हे राजकारणी आपले कमिशन ठरवून घेतात. त्यामुळे विविध प्रकारच्या विकास कामात अडचणी निर्माण होतात. 


कमिशन घेऊन स्वतःचा स्वार्थ साधतात ते राजकारणी..आणि कमिशन घेऊनही काम बिघडले तरी बोंबलत उठतात ते राजकारणी.. मग विकासाचे काय.? "चोरांच्या उलट्या बोंबा " असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.. गेल्या अनेक वर्षापासून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील ICU विभाग सुरुच आहे . त्याचा लाभ गेल्या अनेक वर्षापासून अनेक रुग्ण घेत आहेत . हे गडचिरोलीच्या नागरिकांना सांगण्याची गरज नाही . हे गचाड राजकारण कश्यासाठी ? अश्पा राजकारण मुळे गडचिरोली जिल्ह्यात येणारे क्लास वन अधिकारी, गडचिरोली जिल्ह्यचा विकास करणारे अधिकारी नाराज होतील व जिल्हयाचा विकास खुंटेलं तात्पर्य एवढेच.


Post a Comment

0 Comments