Ticker

6/recent/ticker-posts

Shivsena Chandrapur l घुग्घुस शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी बंटीभाऊ घोरपडे यांची नियुक्ती






घुग्घुस शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी बंटीभाऊ घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहिर करण्यात आलेल्या आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने घुग्घुस शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी बंटीभाऊ घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्याकरीता चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात घुग्घुस येथील शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी बंटीभाऊ घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना नेते बाळूभाऊ चिकनकर, युवासेना तालुकाप्रमुख हेमराजभाऊ बावणे, वेदप्रकाश मेहता, रघुनाथ धोंगळे, चेतन बोबडे, अजय जोगी, गजानन बांदूरकर, गणेश शेंडे, सतीश देवतळे, महिला आघाडी शहरप्रमुख संध्याताई जगताप, उपशहर प्रमुख संगीता बोबडे, जयश्री नाने व मोठया संख्येत शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments