Ticker

6/recent/ticker-posts

Pombhurna l Chandrapur l snake l जुनगाव येथील महिलेला सर्पदंश, पूर परिस्थिती गंभीर



तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील जुनगाव हे गाव अनेक दिवसापासून पुराच्या वेढ्यात आहे. पुरामुळे शेतात व इतरत्र विषारी साप व स्वापदे ठीक ठिकाणी असल्याचे जाणवत आहे. दिनांक 10 ऑगस्ट रोजी ईश्वर शामराव ठाकूर या 30 वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला होता. पुरामुळे त्याचेवर वेळेवर उपचार होऊ न शकल्यामुळे त्याचा मृत्यू. ही घटना ताजी असतानाच काल दिनांक 12 ऑगस्ट रोजी कुमार मारुती दुधनवार यांच्या बैलांची बैल जोडी पुरात वाहून गेली होती. शेतकऱ्याचे दैव बलवत्तर म्हणून त्याचे दोन्ही बैल गंगापूर च्या जवळ जूनगाव पासून आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर जिवंत निघाले. हा एक परमेश्वरी योगच म्हणावा लागेल.

आज दिनांक 13 ऑगस्ट रोज शनिवारी दुपारी दोन ते अडीच च्या सुमारास शेतात काम करत असणाऱ्या महिलेला सर्पदंश झाला. लिलाबाई सुकलाल चुधरी वय अंदाजे ४० वर्ष असे सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव असून तिला उपचारासाठी गंगापूर मार्गे मोठ्या कसरतीने दवाखान्यात नेण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments