गडचिरोली;- चामोर्शी: सुखसागर झाडे
_चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन हद्दीतील येणापूर येथील एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. मृतक सुजाता जनार्दन गोंगले (वय १४) रा. येणापूर ही विद्यार्थिनी इंदिरा गांधी विद्यालय येणापूर येथे शिकत होती.
२६ फेब्रुवारी २०२२ ला ती सायंकाळी घराबाहेर गेली होती. ती परत घरी आली नाही म्हणून २७ फेब्रुवारी २०२२ ला तिचा भाऊ प्रेमानंद गोंगले यांनी आष्टी पोलीस स्टेशन येथे बहीण हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलीस तपास करण्या अगोदरच आज सकाळी १२.१५ वा. तिचा मृतदेह पुरुषोत्तम विठ्ठल राऊत यांच्या विहिरीत आढळला.
प्रेमानंद गोंगले यांनी पोलीस स्टेशन येथे माहिती दिली होती,त्याआधारे लगेच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मुलीची हत्या झाली आहे की आत्महत्या केली..? याचा तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत.


0 Comments