Ticker

6/recent/ticker-posts

*आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते एटापल्ली तालुक्यात विविध विकासकामाचे भूमिपूजन, लोकार्पण* *अंदाजे 2 कोटी रुपये कामाचे उद्घाटन व लोकार्पण* *माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते रिबीन कापून विकास कामाचे लोकार्पण*



गडचिरोली:- सुखसागर झाडे

 अहेरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील निवडणूक दरम्यान दिलेल्या शब्द पूर्ण करताना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रत्येक विभागातून निधी आणून एटापल्ली तालुक्याचा विकास काम करण्याचा प्रयत्न करीत आहे . आज त्यांनी एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या नवीन इमारत बांधकाम कामाचे उद्घाटन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हालेवारा मुख्य मार्ग ते काराम्पल्ली जाणारा डांबरीकरण रोडचे लोकार्पण करण्यात आले.


 ग्रामपंचायत तोडसा येथील एकरा ते तोडसा मार्गावर  मोठा पुल बांधकामांचे उद्घाटन  भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले .माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे,वासुदेव गेडाम सरपंच हालेवारा, रमेश टिकले, सांबा हीचामी, गणू मट्टामी माजी सरपंच हालेवारा, लक्ष्मण नरोटे अरुण  मुक्कावार, सत्यनारायण मेरगा ,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्तेगण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments